आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या वर्ल्ड स्लीप डे:सरासरी झोपेच्या बाबतीत जपाननंतर भारतीय घेतात सर्वात कमी झोप

छत्रपती संभाजीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरासरी झोपेच्या बाबतीत जपाननंतर भारतीय घेतात सर्वात कमी झोप २४ तासांत शरीरावर दिसून येतो दररोज सरासरी एक तास कमी झोपेचा परिणाम

आपण आयुष्यातील एकतृतीयांश वेळ झोपेत घालवतो. असे असूनही आपण रोजच्यापेक्षा एक तास कमी झोपलो तर त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. यावरून झोप आपल्या एकूण आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येते. कमी झोपेचा थेट संबंध उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात यांसारख्या आजारांशी असतो. कमी झोपेमुळे त्रस्त असलेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याच्या तक्रारी सामान्यतः आढळतात. एक तास कमी झोपेचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एल्सेव्हियर जर्नलमध्ये झोपेच्या औषधांच्या पुनरावलोकनात आढळून आले की, ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांच्यात आत्महत्येचे विचार आणि त्याची योजना होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळून आले आहे. याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर, मनावर, प्रतिकारशक्तीवर, हार्मोन्सवर होतो.

असा होतो झोपेचा शरीरावर परिणाम हृदय : १ तास कमी झोपेने हृदयावर ताण येतो २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, झोपेच्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास कमी झोपलात तर दुसऱ्या दिवशी हृदयावर जास्त ताण येतो. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत लागते. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

मेंदू : ६ तासांपेक्षा कमी झोप, अल्झायमरचा धोका जे लोक दररोज ६ तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात, निद्रानाश आणि स्लीप एपनिया सारख्या झोपेच्या विकारांनी ग्रस्त असतात, त्यांना मेंदूशी संबंधित अल्झायमरचा धोका जास्त असतो.

इम्युनिटी : कमी झोपेमुळे सर्दी होण्याचा धोका नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दररोज सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्दी आणि सर्दी होण्याचा धोका तिपटीने जास्त असतो.

अँटिबॉडी : अपूर्ण झोपेने ५०% अँटीबॉडीज निर्मिती स्लीप हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने फ्लूसाठी लस घेण्यापूर्वी एक आठवडा पुरेशी झोप घेतली नाही, तर लसीकरणानंतर शरीरात केवळ ५०% अँटिबॉडीज तयार होतात.

झोपेचे योग्य वेळापत्रक कोणते : ७ तासांची पूर्ण झोप, हे ७ दिवस पाळावे स्लीप फाउंडेशनच्या मते, १८ ते ६० वयोगटातील सरासरी व्यक्तीला किमान ७ तासांची झोप आवश्यक असते. एक गोष्ट लक्षात ठेवा - ७ तासांची झोप आरामात पूर्ण करता येईल असे झोपेचे वेळापत्रक बनवा.

झोप व आहाराचा संबंध : जास्त तेल, मसाले व मिठाई खाल्ल्याने मोडते झोप तेल, मसाले आणि मिठाई जास्त खाल्ल्याने झोपेवर परिणाम होतो. मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते, यामुळे हार्ट बर्न किंवा अॅसिड रिफ्लेक्स होतो, यामुळे झोपेवर परिणाम होतो.

झोपेचे ४-७-८ तंत्र झोपेचा दर्जा सुधारते हे तंत्र : हे ४-७-८ श्वास घेण्याचे तंत्र डॉ. अँड्रयू वेल यांनी विकसित केले आहे. हे तंत्र प्राणायामावर आधारित आहे, हे नियमित केल्यावर श्वासावर नियंत्रण मिळवता येते, तर दीर्घ सरावानंतर या तंत्रामुळे लोक लवकर झोपतात. कसे करावे : शरीर सैल सोडून आरामदायक स्थितीत झोपा. आता दातांच्या मागे असलेल्या टाळूने जिभेच्या टोकाला स्पर्श करा. संपूर्ण सरावादरम्यान हे असेच ठेवा. आता श्वास घेण्याच्या एका चक्रात या चार टप्प्यांचे अनुसरण करा. १) सर्वप्रथम तोंड उघडा. आता शिट्टी वाजवल्यासारखा आवाज करत तोंडातून पूर्ण श्वास सोडा. २) आता ओठ बंद करा. हळूहळू आपल्या मनात चारपर्यंत अंक मोजत नाकातून श्वास घ्या. ३) आता ७ सेकंद श्वास रोखून धरा. ४) आता आठ सेकंदांत पूर्वीप्रमाणे शिट्टीचा आवाज करत तोंडातून पूर्ण श्वास सोडा.

टीप : हे एका श्वसनाचे एक चक्र आहे. नवशिक्यांनी अशी जास्तीत जास्त ४ चक्रे करावीत.

डॉ. अनुराधा शहा कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन अँड स्लीप स्पेशालिस्ट