ट्रिक्स : क्वारंटाईनमध्ये भाज्या - फळे जास्त काळ फ्रेश ठेवण्याच्या टिप्स आणि घर असे करावे किटाणू मुक्त 

 • क्वारंटाईनमध्ये भाज्या - फळे जास्त काळ फ्रेश ठेवण्याच्या टिप्स आणि घर असे करावे किटाणू मुक्त

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:57:00 PM IST

लाइफस्टाइल डेस्क : क्वारंटाईनदरम्यान खाण्याचे पदार्थ जास्त काळ फ्रेश ठेवणे आणि संक्रमणापासून वाचवणे खूप मोठे आव्हान असते. छोट्या छोट्या टिप्स आणि सावधगिरी यादरम्यान खूप महत्वाचे ठरतात. जाणून घ्या यांच्याबद्दल....


जास्त काळ अशा साठवाव्यात भाज्या आणि फळे...

 • हिरवी जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी त्यांचे देठ तोडून ठेवावे.
 • स्ट्रॉबेरीस्वच्छ करण्यासाठी एक भाग व्हिनेगरमध्ये 10 भाग मिसळून त्याचे मिश्रण बनवावे आणि त्यामध्ये स्ट्रॉबेरी धुवावी.
 • केली फ्रेश ठेवण्यासाठी प्लास्टिक रॅपने त्याचे मूळ रॅप कारावे, केली काली पडणार नाहीत.
 • बटाट्यांमध्ये कोंब फुटण्यापासून रोखण्यासाठी त्यासोबत एक सफरचंद ठेवावे.
 • कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी पाण्यात धुवून पेपर नॅपकिन किंवा कपड्याने पुसून चांगल्या प्रकारे रॅप करून झिपलॉक बॅगमध्ये बंद करून ठेवावे.
 • टोमॅटो जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याच्या देठाचा भाग खाली ठेवावा आणि खालचा भाग वर ठेवावा.

अशी करावी घरातून किटाणूंची सुट्टी...

 • एंट्रन्स गेट आणि दरवाज्याचे हॅण्डल : हाउसहोल्ड क्लीनर्स जॅमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमीत कमी 70 टक्के असावे, त्याचा उपयोग करा. हे स्प्रे करून 5 मिनिटे सोडून द्यावे. जर्म्स मरतील.
 • बाथरूम आणि बाथरूम स्विच : लिंबू कापून बेकिंग सोड्यामध्ये डिप करून स्विच साफ करावे. चपलांचे रॅक घराबाहेर प्रवेश द्वारापासून दूर असले पाहिजे.
 • किचन सिंक आणि काउंटरटॉप : स्पंजने फूड डिपॉझिट आणि एक्स्ट्रा साबण रगडून साफ करावा. पाणी भरून त्यात ब्लीच मिसळावे. काही वेळ तसेच राहू द्यावे. मग पाण्याने धुवावे.
 • टीव्ही, एसी रिमोट कंट्रोल, लॅपटॉप आणि कंप्यूटर कीबोर्ड : यांची बॅटरी, कव्हर, रिमूव्हेबल पार्ट्स काढून सॅनिटायझरने साफ करावे. इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करताना स्विच आठवणीने बंद ठेवावे.

घर दिसेल मोकळे मोकळे....

 • खुर्ची - टेबल, सोफा अशाप्रकारे कव्हर करू नयेत की, त्यांचे पाय दिसू नये. पाय दिसतील तर जास्त स्पेस दिसेल, ज्यामुळे रूम मोकळी मोकळी दिसेल.
 • पडदे काही इंच वर बांधावे. यामुळे जागाही जास्त दिसेल आणि सफाई करतानाही सोपे होईल.
 • लिविंग रूममध्ये सजावटीचे खूप सामान ठेऊ नये. 2-3 रोपे ठेवली तर हवादेखील शुद्ध राहील आणि रुमदेखील मोठी वाटेल.
 • पायऱ्यांच्या खाली असलेली या जागा अनेकदा रिकामी असते किंवा स्टोअररूमप्रमाणे वापरली जाते. ज्यामध्ये आपण अडगळीचे सामान भरतो. येथे काही फ्लॉवर पॉट्स ठेऊ शकता.
X