आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुर्वेद:अनेक आजार आणि संसर्गापासून बचावासाठी तुळशीचा काढा फायदेशीर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये रोगांना बरे करण्याची क्षमता आहे

आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये रोगांना बरे करण्याची क्षमता आहे. तुळस संसर्गाला दूर करण्याव्यतिरिक्त ताण आणि इतर रोगांविरुद्ध नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते. सर्दीच्या प्रभावाला कमी करते. त्याचबरोबर तापाचा संसर्ग कमी करण्याव्यतिरिक्त मलेरिया, कांजण्या (चिकन पॉक्स), गोवर, इन्फ्लुएंझा, आणि दमा यासारख्या आजारांवरही उपचारात्मक आहे. 

तुळशी हृदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत, फुप्फुस, उच्च रक्तदाब, आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त आहे. संसर्गाच्या वेळी या तुळशीचा काढा बनवून प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

साहित्य : ५०० ग्रॅम तुळशीची वाळवलेली पाने (सावलीत वाळवलेली), ५० ग्रॅम दालचिनी, १०० ग्रॅम तेजपान, २५० ग्रॅम बडीशेप, १५० ग्रॅम लहान वेलचीचे दाणे, २५ ग्रॅम काळे मिरे.

तुळशीचा काढा बनवण्याची सोपी पद्धत

सर्व साहित्य एक-एक करून खलबत्त्यात कुटून घ्या. आता हे सर्व साहित्य मिसळून एका बरणीमध्ये भरून ठेवा. २ कप चहासाठी अर्धा चमचा पूड पुरेशी आहे. २ कप पाणी एका पातेल्यात गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे. पाणी उकळल्यावर पातेलं गॅसवरून खाली काढून त्यात अर्धा लहान चमचा हे मिश्रण घालून झाकावे. पुन्हा उकळी घेऊन नंतर गाळून घ्यावे आणि कोमट करून प्यावे.

बातम्या आणखी आहेत...