आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मुले ठरत आहेत मंकीपॉक्सचे शिकार:11 राज्यांमध्ये 31 मुलांना लागण; वांशिक भेदभावामुळे गरजूंना दिली जात नाही लस

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंकीपॉक्सचा केवळ ज्येष्ठांवरच नाही तर लहान मुलांवरही वाईट परिणाम होतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या 11 राज्यांमध्ये आतापर्यंत 31 मुलांना मंकीपॉक्सच्या विषाणूची लागण झाली आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, सर्व 50 राज्यांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये आढळले आहेत.

टेक्सासमध्ये 9 मुले मंकीपॉक्सचे शिकार

टेक्सास डिपार्टमेंट ऑफ स्टेट हेल्थ सर्विसच्या आकडेवारीनुसार, येथील 9 मुलांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. दुसरीकडे, संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी आहे, अशा लोकांना हा आजार लवकर होतो. तसेच लोकांना लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

लसीकरणावरुन होत आहे भेदभाव

मंकीपॉक्स या संसर्गाच्या अगदी सुरुवातीला, राष्ट्रपती जो बायडेन यांनी प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना लसेची सर्वात जास्त गरज आहे त्यांना लस मिळत नाही. सीडीसीच्या मते, कृष्णवर्णीय लोकांना फक्त 10% डोस मिळाला आहे, तर ते यूएस लोकसंख्येपैकी एक तृतीयांश आहेत.

यापूर्वी ब्लूमबर्गच्या एका अहवालात असे सांगण्यात आले होते की, मंकीपॉक्स लसीच्या नावाखाली कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक लोकांमध्ये भेदभाव केला जात आहे. लसीकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. श्वेत वर्णीय आणि श्रीमंत भागात हे लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते.

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 54 हजार

Monkeypoxmeter.com च्या आकडेवारीनुसार, जगात मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 54,630 झाली आहे. हा आजार आतापर्यंत 103 देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये ब्रिटन, स्पेन, यूएसए, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि ब्राझील हे टॉप 10 देश प्रभावित आहेत.

यूएस मध्ये मंकीपॉक्सच्या प्रकरणांची सर्वाधिक संख्या 19,355 आहे. त्याच वेळी, भारतात मंकीपॉक्सचे 10 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...