आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नॉलेज सिरिज:6 मिनिटांत अर्धा किमी चाला किंवा धावा, 30 सेकंदांत नाडी 80 च्या खाली असल्यास तुम्ही निरोगी

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजनची पातळी ९३ च्या खाली असेल तर सपोर्ट द्या, पोटावर झोपवा

कोरोनाने प्रत्येकाला आरोग्याबाबत सजग केले आहे. आपण पूर्णपणे निरोगी आहोत की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. बीपी, शुगर तपासणाऱ्या उपकरणांची खरेदी वाढली आहे. पण या आरोग्य मापदंडांबाबत संभ्रमही आहेत. किती बीपी सामान्य आहे, निरोगी असण्याचे मापदंड कोणते, अशा प्रश्नांवर ‘दैनिक भास्कर’चे पवन कुमार यांनी हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. त्यांचे हे मत...

आपल्या डॉक्टरच्या संपर्कात राहा, जी औषधे घेत आहात ती नियमित घेत राहा...सतत असामान्य रक्तदाब असला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
महामारीच्या या काळात सामान्य व्यक्तीने आपल्या कोणत्या आरोग्य मापदंडांवर लक्ष ठेवावे?
सकारात्मक विचारांसह आपला जुना आजार नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा, जी औषधे घेत आहात ती नियमितपणे घेत राहा. रक्तदाब आणि मधुमेह कोणत्याही स्थितीत नियंत्रित ठेवा. सामान्य व्यक्तीसाठी पल्स रेट ७२ असतो. पण रोजच्या कामात तो ६५ ते १०० दरम्यान घटतो-वाढतो. जर तुम्ही सहा मिनिटांत १७०० फूट म्हणजे अर्धा किमी चालत किंवा धावत असाल आणि त्यानंतर तुमचा पल्स रेट पुढील अर्ध्या मिनिटात ८० च्या खाली येत असेल तर शरीराचे मुख्य आरोग्य मापदंड म्हणजे रक्तदाब, शुगर किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ठीक आहे. घाबरण्याचे काही कारण नाही.

सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब किती असावा? तो महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळा असतो का?
सामान्य परिस्थितीत रक्तदाब १२०/८० असावा. हृदय प्रत्येक ठोक्यासोबत शरीरात रक्ताचा प्रवाह करणाऱ्या नसांवर एक दाब निर्माण करते. त्यालाच आपण रक्तदाब म्हणतो. नसांमधून रक्त जाताना जो दाब असतो, त्याला सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात, तो सामान्यत: १२० असतो. रक्त गेल्यानंतरच्या दाबाला डायस्टॉलिक प्रेशर म्हणतात, तो सामान्यत: ८० असतो. महिला आणि पुरुषांमध्ये त्यात विशेष फरक नसतो.

रक्तदाब कोणत्या मर्यादेनंतर उच्च किंवा कमी श्रेणीत मानला जाईल?
जर रक्तदाब सामान्य म्हणजे १२०/८० पेक्षा जास्त म्हणजे १४०/९० झाला किंवा कमी म्हणजे १००/७० झाला तर त्याला असामान्य रक्तदाब मानले जाईल. तथापि, अनेक कारणांमुळे सामान्य रक्तदाबच १२०/८० पेक्षा थोडा कमी किंवा थोडा जास्त होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाबात किरकोळ फरक असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही.

जर एखादी व्यक्ती कोरोना काळातच रक्तदाब मोजण्याबाबत सजग झाली आणि दाब १२०/८0 पेक्षा कमी किंवा जास्त असेल तर काय करावे?
जर तुम्ही रक्तदाबाचे नियमित मॉनिटरिंग केले नसेल तर तुमच्या शरीरासाठी सामान्य रक्तदाब किती आहे हे माहीत होऊ शकत नाही. अशा स्थितीत फक्त एकदा दाब मोजून एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. त्याची योग्य पद्धत म्हणजे दिवसभरात तीन ते चार वेळा रक्तदाब मोजा आणि त्याचा चार्ट बनवा. जर रक्तदाब प्रत्येक वेळी एकाच रीडिंगच्या आसपास असेल आणि तुम्हाला इतर समस्या जाणवत नसेल तर स्थिती सामान्य आहे. पण जर रीडिंगमध्ये दिवसभरात खूप बदल असेल किंवा असामान्य रक्तदाबासह तुम्हाला इतर समस्याही जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

असामान्य रक्तदाबामुळे तत्काळ धोके कोणते? ही एखाद्या आजाराची किंवा अटॅकची सुरुवात आहे?
सतत असामान्य रक्तदाब असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. अचानक रक्तदाब खूप वाढणे किंवा घटण्याने शरीर कोसळते. वरचा रक्तदाब २०० आणि खालचा १२० झाला तर नाकातून रक्तस्राव होऊ शकतो, ब्रेन हॅमरेज होऊ शकते. रक्तदाब वाढल्यास हृदयाची धडधड वाढेल. अनेकदा हृदयाची धडधड वाढल्यास रक्तदाब वाढतो.

रक्तदाबातील किरकोळ बदलामुळे घाबरू नका, बऱ्याचदा शरीरातील इतर समस्यांमुळे रक्तदाब वाढतो-घटतो
तुम्ही दिवसभरात तीन ते चार वेळा रक्तदाब मोजा आणि त्याचा चार्ट तयार करा. जर रक्तदाब प्रत्येक वेळी एकाच रीडिंगच्या आसपास आला आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या इतर काही समस्या जाणवत नसतील तर स्थिती सामान्य आहे.

ऑक्सिजनची पातळी ९३ च्या खाली असेल तर सपोर्ट द्या, पोटावर झोपवा
सामान्य व्यक्तीच्या आॅक्सिजनची सॅच्युरेशन पातळी किती हवी ? ती आपाेआप कमी-जास्त हाेते का ?
सामान्य व्यक्तीच्या आॅक्सिजनची सॅच्युरेशन पातळी ९५ असावी. जर ती ९३ पेक्षा कमी असेल तर प्राणवायूचा आधार द्या व ९० च्या खाली गेली तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करा. काही वेळा वातावरण स्वच्छ नसेल तरीही सॅच्युरेशन कमी-जास्त हाेऊ शकते. सामान्यत: पाेटावर झाेपल्यास जास्त आॅक्सिजन शरीरात जाताे.

काेणत्या आॅक्सिजन पातळीची चिंता करावी व किती असताना डाॅक्टरचा सल्ला वा रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज असते?
९० पेक्षा कमी आॅक्सिजन सॅच्युरेशन झाल्यास चिंता वाढू शकते. पण रुग्णाला डाॅक्टरकडे घेऊन जावे व कृत्रिम आॅक्सिजन द्यावा.

घरात थर्मामीटरने माेजणे आता सामान्य गाेष्ट आहे. त्यासाठी मापदंड काय आहे ?
रुग्णालय वा घर प्रत्येक ठिकाणी डिजिटल थर्मामीटरनेच शरीराचे तापमान माेजले जाते. थर्मामीटर जे तापमान दाखवते ते याेग्य तापमान असते. शरीराचे तापमान थर्मामीटरने दर्शवलेल्या तापमानापेक्षा कमी वा जास्त आहे, असे म्हणणे याेग्य ठरणार नाही.

सामान्यत: शरीराचे तापमान किती असते ?
शरीराचे तापमान साधारणपणे ९८.४ असते. काेविडमध्ये एक अंश वाढते. संध्याकाळी काेराेना रुग्णांचे तापमान एक अंश वाढते असेही दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...