आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नवी संशोधने:पायी चालल्याने होते गुडघेदुखी खूप कमी

डानी ब्लम14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नव्या संशोधनानुसार ऑस्टियोआर्थरायटिसने ग्रस्त लोकांची गुडघेदुखी पायी चालल्याने कमी होऊ शकते. संशोधकांनी गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिसने प्रभावित ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या एक हजारपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण केले होते. काही लोकांना सुरुवातीला सातत्याने वेदना होत होत्या, तर इतर लोकांना कधी कधीच व्हायच्या. ज्यांना सातत्याने वेदना होत नाहीत आणि जे पायी चालण्याचा व्यायाम करत होते अशा लोकांची स्थिती चार वर्षांनंतर पाहिली असता त्यांना नियमित वेदना होत नसल्याचे दिसले. त्यांच्या गुडघ्यांची झीजही कमी आढळली. त्यामुळे चालणाऱ्या लोकांना गुडघेदुखीत फायदा झाला आणि जे लोक नियमित चालत नाहीत त्यांच्या वेदना वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

संशोधन प्रमुख ह्युस्टनच्या बेलोर मेडिसिन कॉलेजच्या डॉ. ग्रेस सियाओ व्ही. लो सांगतात, अशा वेदनांत औषधांच्या अधिक सेवनाने किडनी विकार आणि अल्सर होऊ शकतो. मात्र, ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये व्यायाम फायद्याचा आहे. संशोधनानुसार नितंब, हात आणि पायांच्या सांध्यांचा ऑस्टियोआर्थरायटिस व्यायामाद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...