आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन नियंत्रण:फक्त 1 आठवड्यातील कमी झोपेने एक किलोपर्यंत वजन वाढू शकते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विज्ञान आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 5 टिप्स वजन नियंत्रणात मदत करतील

जास्त वजन हे हृदय रोग, मधुमेह, स्ट्रोक आणि काही विशेष प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. वजन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सुरक्षित पद्धतीने एका महिन्यात ३ किलोपर्यंत वजन कमी करता येऊ शकते. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’नेही याला पुष्टी दिली आहे. विज्ञानाधारित या पाच पद्धतींनी आपण वजन नियंत्रणात आणू शकतो.

१) न्याहारीत जास्त प्रथिने घ्या
६०% पर्यंत जेवणाची इच्छा घटते

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रथिनांचे चयापचय करण्यासाठी शरीराला अधिक कॅलरी खर्च कराव्या लागतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, दिवसभरातील एकूण कॅलरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण आपण २५ टक्क्यांपर्यंत वाढवले तर भुकेची इच्छा ६० टक्क्यांपर्यंत घटते. त्यामुळे कॅलरी घेणेही घटते.

२) चांगली झोप घ्या
कमी झोपेमुळे भूक कमी करणारे संप्रेरक घटते, भूक वाढते

झोप कमी झाल्यास भूक कमी करणाऱ्या लेप्टिन संप्रेरकाचा स्राव कमी होतो. जेवण पचवणारे घ्रेलिन संप्रेरक वाढते. युनिव्हर्सिटी ऑफ कोलरॅडोनुसार, एखादी व्यक्ती आठवड्यात पाच तास झोप घेत असेल तर तिचे वजन एक किलोपर्यंत वाढू शकते.

३) सावकाश खा
वेगाने जेवल्याने पोटात जास्त कॅलरी, भूक नियंत्रणात नसते

हेल्थलाइन या आरोग्य नियतकालिकानुसार, जेवण पचवणारे घ्रेलिन संप्रेरक व भुकेवर नियंत्रण करणारे संप्रेरक मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी २० मिनिटे लागतात. वेगाने जेवण केल्यास मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपण जास्त कॅलरी घेतो. त्यामुळे भूक नियंत्रणात नसते.

४) साखरयुक्त पेये, फळांचा रस टाळा
रोजचे एक साखरयुक्त पेय २ किलोपर्यंत वजन वाढवू शकते

हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार, साखरयुक्त पेये व गोड फळांचा रस वजन नियंत्रण करणाऱ्या प्रणालीत अडथळा निर्माण करतो. कोला, फळांचा रस, एनर्जी ड्रिंक यातील एक पेय प्यायले व जेवणातून कॅलरी कमी केली नाही तर वर्षभरात जवळपास दोन किलोपर्यंत वजन वाढू शकते.

५) पौष्टिक अन्नाने वजन होते कमी
डाळी, पालेभाज्या, शेंगादाणे वजन कमी करण्यात प्रभावी
वेब एमडीनुसार डाळी, सोयाबीन आणि प्रथिने यातून चांगले फायबर मिळते. ते कॅलरीचे प्रमाण कमी करतात. पालेभाज्यांतही उच्च फायबर व कमी कॅलरी असतात. त्यामुळे भुकेची जाणीव कमी होते. वजन कमी होण्यास मदत होते. शेंगादाण्यात प्रथिनांसह पौष्टिक पदार्थ असतात. ते वजन नियंत्रणात उपयोगी ठरतात.

बातम्या आणखी आहेत...