आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संसर्ग:विषाणूशी लढणाऱ्या अँटिबॉडी काय आहेत? कशा तयार होतात ?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या शरीरात कोरोनाविरोधात दोन प्रकारच्या अँटिबॉडी बनताहेत : शास्त्रज्ञ

कोरोना संसर्ग चाचणीसाठी अनेक शहरांत सर्व्हे सुरू आहेत. त्यात शरीर विषाणूशी लढणाऱ्या अँटिबॉडी तयार करतेय किंवा नाही, हे पाहिले जात आहे. अँटिबॉडी काय असतात, त्या कशा तयार होतात, आजारापासून किती दिवस दूर राहता येईल, हे जाणून घेऊया..

अँटिबॉडी काय आहे? 
इंग्लिश मुळाक्षर ‘वाय’ आकारातील प्रथिने म्हणजे अँटिबॉडी. एक प्रकारच्या त्या श्वेतपेशी आहेत. अँटिबॉडीला इम्युनोग्लोबुलीनही संबोधले जाते. जीवाणू किंवा विषाणू (पॅथोजन) शरीरात प्रवेश करतात तेव्हा रोगप्रतिकारशक्ती (इम्युनोग्लोबुलीन प्रोटीन) त्याच्याशी लढते व अँटिबॉडी तयार होते. त्यांना शरीराचे गेट कीपर म्हणतात.

अँटिबॉडी किती प्रकारच्या असतात?
अनेक प्रकार आहेत. परंतु कोरोनाच्या विरोधात दोन प्रकारच्या अँटीबॉडी तयार होत आहेत. इम्युनोग्लोबुलीन-एम व इम्युनोग्लोबुलीन-जी.

या अँटिबॉडी किती िदवसांत विकसित होतात व शरीरात किती दिवस राहतात?
विषाणू शरीरात प्रवेश करताच त्याच्या काही वेळातच शरीर आयजीएम तयार करण्यास सुरुवात करते. सुमारे १४ दिवसांनंतर दुसऱ्या अँटिबॉडी आयजीएम तयार होतात. त्या दीर्घकाळ टिकतात.

शरीरात आयजीएम किंवा आयजीजी अँटिबॉडी तयार झाल्यास बाधित रुग्ण ठीक झाला असे म्हणता येईल?
सध्या तरी कोरोना होऊन ठीक झाला असेल, असे मानावे लागेल. परंतु सामान्य फ्लूनंतरही त्याच्याशी मिळत्याजुळत्या अँटिबॉडी तयार होतात. कोविडदेखील एक प्रकारचा फ्लू आहे.

एकदा अँटिबॉडी तयार झाल्यास दुसऱ्यांदा विषाणू त्रास देणार नाही?
कोरोनाच्या बाबतीत सध्या असे काही निश्चित सांगता येत नाही. अद्यापही अध्ययन सुरू आहे.

कोविड झाला पण पत्ताही नाही, असे कसे शक्य?
ही बाब सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकदा वारे वाहू लागते. तेव्हा एखाद्याला वाऱ्याचा जोरदार लोट लागतो. काहींना त्याची झुळूक जाणवते. काहींना जाणवत नाहीत. काही प्रमाणात हा विषाणूही असाच परिणाम दाखवतो. हा विषाणू एवढा परिणाम करणारा नसल्याने त्याची अनेकदा लक्षणे दिसत नाहीत.

डॉ. ज्याेती मुट्‌टा, मायक्रोबायोलॉजिस्ट
डाॅ. सुजितकुमार सिंह, संचालक एनसीडीसी