आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टजन्मानंतर बाळाला लगेच अंघोळ घालणे हानिकारक:किमान 24 तासांनी अंघोळ घाला; मृत्यूदर कमी होईल, एम्सचे संशोधन

नवी दिल्ली I मार्जिया जाफरएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ​घरात नवीन बाळ जन्माला आल्यानंतर आनंदाला उधाण आलेले असते. मात्र, याकाळात घरातील लोकांनी आपल्या बाळाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
 • विशेष करून बाळाची अंघोळ घालताना काय काळजी घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टी टाळल्या तर बाळाची अंघोळ अधिक सुखकर होईल. याबाबतची माहिती जरूर वाचा.

नवजात बाळाच्या अंघोळीबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. बाळाला पहिल्यांदा अंघोळ कधी घालावी ? आतापर्यंत बहुतेक संस्था बाळांना जन्मानंतर एक किंवा दोन तासांच्या आत आंघोळ घालत असत. परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि एम्स दिल्ली आणि AIIMS ऋषिकेश यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, बाळाच्या जन्मानंतर त्याला 24 तासांपर्यंत अंघोळ घालू नये.

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना गडबड करू नका

बाळ जन्माला आल्यानंतर त्वरीत व पहिल्यांदाच अंघोळ घालण्यासाठी खूप गडबड करू नका, पुर्वी बाळ जन्माला आल्यानंतर काही तासातच त्याला अंघोळ घातली जात असे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, नवजात बाळाला अंघोळ घालण्यासाठी किमान 24 ते 48 तास थांबावे. अंघोळ घालण्यासाठी जितकी जास्त प्रतीक्षा कराल तितके चांगले आहे. याशिवाय, बाळाला दररोज आंघोळ करणे आवश्यक नाही. नवजात मुलाची नाळ पूर्णपणे बरी होईपर्यंत. त्यासाठी अंघोळीची घाई करणे चुकीचे ठरेल. असा तज्ज्ञांनी सल्ला दिलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाला अंघोळ घालायची असेल तर तुम्ही स्पंज बाथ घालू शकतात. किंवा बाळाचा चेहरा आणि डोके स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मऊ कापड वापरू शकता.

बाळाला अंघोळ घालण्यासाठी उशीर का करावा

बहुतेक रुग्णालये बाळाला पहिल्यांदा आंघोळ घालण्याची प्रतीक्षा करण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा मानक प्रोटोकॉल पाळतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, हे नवजात बालकांसाठी सुरक्षित आहे. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी :

 • आई आणि बाळाचे नाते घट्ट होते

बाळाच्या जन्मानंतरची पहिली काही मिनिटे आई आणि बाळाच्या नात्यासाठी खूप महत्त्वाची असतात. असा अनुभव आहे. ज्या माता बाळाला जन्मानंतर लगेच त्यांच्या त्वचेच्या संपर्कात ठेवतात. त्यांच्या तापमान नियंत्रणात, रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि त्यांना स्तनपान अधिक चांगल्या पद्धतीने करता येते.

 • संसर्गाचा धोका कमी होतो

जन्मादरम्यान, बाळाच्या त्वचेवर व्हर्निक्स नावाचा पांढरा थर असतो. त्यात प्रथिने असतात जी बाळाला जन्मादरम्यान उद्भवू शकणार्‍या अनेक हानिकारक संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. जसे की मेंदुज्वर, न्यूमोनिया, रक्त संक्रमण. व्हर्निक्स बाळाचे संरक्षण करण्यासाठी कार्य करते आणि बाळाच्या जन्मानंतर त्याला लगेच अंघोळ घातली तर व्हर्निक्सचा थर काढला जातो. परिणामी संसर्गाचा धोका वाढतो. बहुतेक रुग्णालयांमध्ये हातमोजे घातले जातात. याचा अर्थ जे मुलाच्या थेट संपर्कात येतात. त्यांनी हातमोजे घालावेत. बाळाला संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे केले जाते.

 • तापमान नियंत्रणात राहते

बाळाला आईच्या गर्भाशयात उष्णता मिळते. ज्याचे तापमान 98.6 अंश असते. प्रसूतीनंतर नवजात बाळाला खूप कमी तापमानात (बहुतेक 70 अंश) तोंड द्यावे लागते. त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्याची गरज असते. यासोबतच, जेव्हा बाळाला जन्मानंतर लवकर अंघोळ घातली जाते. तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान खूप कमी होते. त्याला हापोथर्मियाचा धोका वाढतो.

 • रक्तातील साखर सुधारते

बाळाच्या जन्मानंतर काही तासांनी अंघोळ केल्याने त्याची साखरेची पातळी कमी होऊ शकते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला बाह्य वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते. शुगर लेव्हल नियंत्रित करणारी प्लेसेंटा नसल्यामुळे त्याला बाह्य वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जाते. याशिवाय बाळाला आंघोळ केल्याने त्याला ताण येऊ शकतो. त्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात आणि साखरेची पातळी कमी होते.

 • त्वचा मऊ ठेवली जाते

बाळाच्या त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवणे महत्वाचे आहे. व्हर्निक्स नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि नवजात मुलाच्या त्वचेचे संरक्षण करते. आंघोळ केल्याने बाळाच्या त्वचेतील व्हर्निक्स काढून टाकले जाते, त्यामुळे तुमच्या बाळाला लवकर आंघोळ घालणे टाळा.

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना महत्त्वाच्या गोष्टी

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालण्यापूर्वी तुमचे बाळ त्यासाठी तयार आहे की नाही याची खात्री करा. जर त्याला चिडचिड होत असेल तर अंघोळ घालण्यापूर्वी आणखी काही दिवस स्पंज बाथ करावे. नवजात बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया...

 • योग्य वेळेची वाट पहा

आंघोळ सुरू करण्यापूर्वी योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. नाभीसंबधीचा दोर पडेपर्यंत आणि नाभी पूर्णपणे बरी होईपर्यंत बाळाला आंघोळ घालण्यास सुरुवात करू नका. यावेळी बाळाला स्पंज बाथ दिले जाऊ शकते.

 • दिनचर्या तयार करा

तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ करण्यासाठी कितीही वेळ निवडता, दररोज त्याच वेळी आंघोळ करा. हे बाळाला पुढे काय होणार आहे हे समजून घेण्यास मदत करेल, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये बाळाला आंघोळीनंतर झोप येते.

 • बाळाच्या सर्व गोष्टी एकत्र ठेवा

तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ घालण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तिच्या सर्व गोष्टी जसे की साबण, शॅम्पू, बेबी टॉवेल, बेबी टबमध्ये कोमट पाणी, ब्लँकेट इत्यादी ठेवा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अडथळा येणार नाही.

 • स्नानगृहात उबदार पणा ठेवा

ज्या स्नानगृहात तुम्हाला तुमच्या बाळाला आंघोळ द्यायची आहे. ते उबदार ठेवा. कारण त्याच्या शरीरातील उष्णता खूप लवकर नष्ट होऊ शकते. तुमच्या बाळाला बाथरूममध्ये नेण्यापूर्वी थोडा वेळ गरम शॉवर चालवा किंवा खोलीचे थर्मोस्टॅट सेटिंग 75 ते 80 अंशांवर सेट करा.

 • बाळाला व्यवस्थित धरा

अंघोळ घालताना बाळाला नीट धरा जेणेकरून तो घसरणार नाही. साबण, शैम्पू आणि पाणी बाळाची पकड कमी करू शकतात. आपल्या बाळाचे डोके आपल्या हाताच्या तळहातावर धरा, नंतर दुसऱ्या हाताने साबण आणि पाणी वापरा.

 • जास्त साबण लावू नका

तुमच्या बाळाच्या त्वचेवर जास्त साबण वापरणे टाळा. जास्त साबण वापरल्याने तिची त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच साबण सौम्य असल्याची खात्री करा.

 • सहजतेने गुप्तांग स्वच्छ करा

बाळाच्या जननेंद्रियाचा भाग स्वच्छ करताना काळजी घ्या. नवजात मुलाच्या गुप्तांगांना साबण लावू नका.

 • बाळाला घट्ट गुंडाळा

आंघोळीनंतर बाळाला काळजीपूर्वक टबमधून बाहेर काढा आणि टॉवेलने गुंडाळा. तिचे गुप्तांग कापडाने हळूवारपणे पुसा.

(महत्त्वाची टिप्स - तुमचा पहिला आंघोळीचा अनुभव संस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. पण यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

बातम्या आणखी आहेत...