आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्‍सप्‍लेनर:स्टीफ पर्सन सिंड्रोम म्हणजे काय, उपचार कसे ?

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाॅलीवूड चित्रपट टायटॅनिकची गायिका सेलीन डायोन स्टिफ पर्सन सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. याची माहिती तिने स्वत: दिली. आजारामुळे तिने २०२३ पर्यंत होणारे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द केले आहेत. कॉप्रिहेन्सिव्ह पेन रिकव्हरी ऑफ क्लीवलँड क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डाॅ. पवन तन्खा यांच्यानुसार, १० लाख लोकांपैकी एकाला हा आजार होतो. त्यांनी या आजाराची माहिती दिली...

{स्टिफ पर्सन सिंड्रोम कोणता आजार आहे? हा आजार प्रामुख्याने मेंदू आणि पाठीच्या कण्यातील हाडावर परिणाम होतो. यामुळे रुग्ण दुर्बल होऊ शकतो. त्यासाठी काम करणे कठीण होऊ शकते. रुग्ण व्हिलचेअरवर जाऊ शकतो किंवा पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहू शकतो. आजारात पीडित स्वत:ची देखभाल करण्यात असमर्थ ठरतो.

{याचे लक्षण काय आहे? या मेंदूविकारात ऑटोइम्यून संकेत दिसतात. त्यात जास्त स्नायू आखडतात,अस्वस्थता आणि मांसपेशी एवढ्या वेदना हाेतात की, सांधे निखळून हाडे मोडू शकतात. प्रथमच १९२० च्या दशकात हा आजार समोर आला होता. तेव्हा डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांना वुडमॅन म्हटले होते. यामध्ये अनेकदा असे टप्पे आले, ज्यात सामान्य हालचालीही बंद होतात. शरीर आखडल्यावर रुग्णाच्या शरीराच्या वरून खालपर्यंतचा भाग जाम होतो.

{या आजाराचा धोका किती आहे? येल स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये मेंदूविकाराचे सहायक प्रा.डॉ. रिचर्ड नोवाक यांनी सांगितले की, कोणत्याही वयातील व्यक्तीला आजार होऊ शकतो. मात्र, ३० ते ६० वयाच्या लोकांमध्ये ही सामान्य बाब आहे. अधिक तणाव असल्यावरही हा आजार होण्याची शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांत हा आजार सामान्य आहे.

{याची चाचणी कशी केली जाते? तसे पाहता यावर कोणताही इलाज नाही, मात्र डॉक्टर्स लक्षणाच्या आधारावर वेदना व्यवस्थापनावर भर देतात. यामध्ये औषध किंवा औषधाशिवाय दोन्ही पद्धतीच्या पॅचवर्कद्वारे उपचार केले जातात. त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रुग्णाची हालचाल चांगली व्हावी आणि त्याला आराम मिळावा हे पाहिले जाते. नॉर्थवेस्टर्न फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये न्यूरॉलॉजीचे एक सहायक प्रा. डाॅ. सेंडा अझरौद-ड्रिस यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे शरीरात स्टिफ पर्सन सिंड्रोम या आजाराशी लढण्याची क्षमता चांगली करण्यात मदत मिळते.

बातम्या आणखी आहेत...