आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोविड-19 :हँड सॅनिटायझरचा वापर करतानालक्षात ठेवा 60:20 चा हा फॉर्म्युला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीआधी केवळ पाच टक्के लोक योग्य पद्धतीने हात धूत होते

कोविड-१९ पासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) फिजिकल डिस्टन्सिंगनुसार एकमेकांत एक मीटर अंतर राखणे व हातांच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. कोरोनाशी लढताना स्वच्छता आणि शारीरिक अंतर हीच प्रमुख शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे आणि किमान ६० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे. डब्ल्यूएचओसारख्या संस्था महामारीच्या या काळात हातांच्या स्वच्छतेवर विशेष भर देत आहे. खरं तर आपल्या वडीलधाऱ्यांनी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याचे सांगितलेले आहेच. अशा प्रकारे हात स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे ही आपली जुनी प्रथा आहे. पण, सध्याच्या व्यग्र जीवनशैलीत आपण हातांच्या स्वच्छतेकडे हवे तेवढे लक्ष देत नाही. कोरोनाशी लढण्यासाठी हँड सॅनिटायझर कसे उपयुक्त आहे, त्याचे योग्य प्रमाण काय आहे आणि त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.


असे काम करते हँड सॅनिटायझर

अल्कोहोलमध्ये प्रोटीन आणि सूक्ष्म जीवांना (उदा. कोविड-१९ विषाणू) नष्ट करण्याची आणि त्यांच्या आंतरिक प्रणालीला बाधित करण्याची क्षमता असते. अल्कोहल बेस्ड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किमान ६० टक्के असावे. अधिकांश अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरमध्ये इथेनॉल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, एन-प्रोपेनोल वा यातील कोणत्याही दोन उत्पादनांचे काॅम्बिनेशन असते. त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून यात काही प्रमाणात ग्लिसरीन मिसळले जाते.


अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरताना हे करा

सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावे. खराब किंवा गुळगुळीत हातांवर हँड सॅनिटायझर काम करणार नाही. अशा वेळी साबण आणि पाण्याने हात धुवावेत.


डब्ल्यूएचओने सांगितले सॅनिटायझरचे २ फॉर्म्युले

डब्ल्यूएचओनुसार सॅनिटायझरचे दोन फॉर्म्युले असू शकतात. पहिला : ज्यात ८० टक्क्यांपर्यंत इथेनॉल, ०.१२५ टक्के हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि १.४५ टक्के ग्लिसरॉल असावे. दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार यात इथेनॉलऐवजी ७५ टक्के आयसोप्रॉपिल अल्कोहोल असू शकते. उर्वरित घटक पहिल्या फॉर्म्युल्याप्रमाणेच असतील.

- अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलनुसार : हातांच्या योग्य स्वच्छतेने श्वासांशी संबंधित संसर्गाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो.


डॉ. विनोद रवींद्रन

कन्सल्टंट, ऱ्ह्युमेटॉलॉजिस्ट सेंटर फॉर ऱ्ह्युमेटॉलॉजी कालिकत, केरळ

0