आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराQ. पोटासाठी भरड धान्य किती उपयुक्त आहे? A. भरड धान्यात जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पाचनक्रिया सुधरते. ब्लॉटिंग, गॅस , पोटदुखीच्या समस्यापासून दूर राहता येते. Q. बाजरी आणि मक्क्याची भाकर खाल्ल्याने प्री-डायबिटीज बरी होऊ शकते का ? A. या भरड धान्यांच्या सेवनाने प्री-मधुमेहाचे रूग्ण बऱ्याच प्रमाणात बरे झाल्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळाले आहेत. Q. मधुमेहाच्या रुग्णांना बाजरी खायला हवी का ? A. बाजरी खाण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे एका पॅनमध्ये २ कप बाजरी घ्या, दोन चमचे तेलात भाजा. लाल झाल्यावर गॅस कमी करा आणि ३ कप भाज्या आणि कोथंबिर टाका. आता उकळू द्या. चांगले शिजल्यावर पाणी अटवा. Q. माझ्या हृदयाचे कार्य ६०% आहे, मी भरड धान्य खाऊ शकतो का? A. संपूर्ण धान्य कोणतीही व्यक्ती खाऊ शकते. पचनाच्या दृष्टीकोनातून हे खूप फायदेशीर आहे. Q. गव्हामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होतो का? A. बाजारात उपलब्ध असलेल्या गव्हाच्या पिठात सामान्यतः परिष्कृत पीठ जोडले जाते जे मधुमेहासाठी चांगले नसते, काही लोक ते लापशी इत्यादी मर्यादित प्रमाणात वापरू शकतात. Q. गव्हात आणखी कोणते भरड धान्य टाकून दळून आणू शकतो. ते आरोग्यासाठी चंागले असते का ? A. रोजच्या अन्नासाठी मिश्र पिठाचे विशिष्ट प्रमाण असते. त्यात गव्हाचे पीठ ६०%, नाचणी १०%, ज्वारी १०%, काळे हरभरे १०%, बाजरी ५%, जवाचे पीठ ५% मिसळता येते.
वर्शी शर्मा आहारतज्ज्ञ , नवी दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.