आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीनएजर्स आईचे का ऐकत नाहीत:यात त्यांचा दोष नाही, हा आहे केमिकल लोचा; या वयात मेंदू दुसऱ्या आवाजाला प्राधान्य देतो

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याचदा माता त्यांच्या किशोरवयीन मुलांमुळे त्रस्त असतात, कारण ही मुले त्यांचे ऐकत नाहीत. आईला वाटतं की लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीला 'काळ्या दगडावरची रेष' समजत असलेल्या मुलाला अचानक काय झालं. तुम्हालाही असेच वाटत असेल, तर त्यासाठी तुमच्या मुलाला दोष देऊ नका.

अलीकडेच, स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी किशोरवयीन मुलांच्या मेंदूवर एक संशोधन केले आहे, ज्यावरून असे दिसून आले आहे की विशिष्ट आवाजांना आपला प्रतिसाद नैसर्गिकरित्या काळाच्या ओघात बदलतो. यामुळे, किशोरांना आईचा आवाज कमी महत्त्वाचा वाटतो.

वयाच्या 13 वर्षांनंतर मेंदू बदलतो

संशोधनादरम्यान, 12 आणि त्याखालील मुलांचे मेंदू स्कॅन करण्यात आले, त्यानंतर त्यांनी आईच्या आवाजाला चांगला न्यूरोलॉजिकल प्रतिसाद दर्शवला. या वयात मेंदूतील भावना वाढवणारी केंद्रे सक्रिय होतात. मात्र वयाच्या 13 नंतर, ते बदलू लागते. या वयात मेंदूला आईच्या आवाजाप्रमाणे न्यूरोलॉजिकल प्रतिसाद मिळत नाही. त्याऐवजी, किशोरवयीन मुलांचा मेंदू नवीन किंवा ओळखीच्याच इतर सर्व आवाजांना जास्त प्रतिसाद दर्शवतो.

हे बदल इतके स्पष्ट होते की, संशोधक केवळ याच आधारावर मुलाच्या वयाचा अंदाज लावू शकले. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे मानसोपचार तज्ज्ञ डॅनियल अब्राम्स म्हणतात, 'जसे लहान मूल आईच्या आवाजाशी जुळवून घेते, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुले अद्वितीय आवाजाशी जुळवून घेतात. किशोरवयात तुम्ही हे करत आहात हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला मित्र आणि नवीन सोबती सापडतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडते. तुमचे मन अज्ञात आवाजांकडे आकर्षित होते आणि अधिक संवेदनशील बनते.

कुटुंबासून थोडे दूर जाण्यात टीनएजर्सचा दोष नाही

दुसर्‍या शब्दात, किशोरवयीन मुले जाणूनबुजून त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे होत नाहीत, तर त्यांची मने परिपक्व होत असतात. लहान मुलासाठी, आईचा आवाज त्याच्या आरोग्यामध्ये आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचा ताण, सामाजिक प्रतिबद्धता आणि परस्परसंवाद प्रक्रियेवर परिणाम होतो. न्यूरोसायंटिस्ट विनोद मेनन म्हणतात, 'किशोर मुले त्यांच्या पालकांचे न ऐकून बंड करताना दिसतात. कारण त्यांचा मेंदू घराबाहेरील आवाजांकडे अधिक लक्ष देण्यास तयार असतो.'

वयाच्या एका टप्प्यावर मूल स्वतंत्र होते
न्यूरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष असे दर्शवतात की जसजसे वय वाढते तसतसे आपण आईच्या आवाजाकडे कमी लक्ष देऊ लागतो. मेनन म्हणतात, 'मुल वयाच्या एका टप्प्यावर स्वतंत्र होते. हे जैविक संकेतांमुळे आहे. किशोरवयात, तो कुटुंबाच्या बाहेर समाजीकरण करू लागतो.'

बातम्या आणखी आहेत...