आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रॉनिक पेन:वेदना रात्री जास्त का जाणवतात ?

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतीही वेदना जी २-३ महिने राहते तिला क्रॉनिक पेन म्हणतात. काहींना रात्र होताच ही वेदना जास्त वाढते. असे का? हार्वर्डशी संबंधित बेन्सन हेन्री इन्स्टिट्यूटमध्ये संचालक अॅलेन स्लावस्बायच्या अनुसार याचे मुख्य कारण हार्मोनल बदल आहे. रात्री अँटी इंफ्लामेट्री हार्मोनची निर्मिती घटते. क्रोनिक पेन शरीरचक्राचेही पालन करते.

रोज झोपण्याआधी रिलॅक्सेशन रुटीन पाळा झोपण्याच्या आधी कमीत कमी २० मिनिटे रिलॅक्सेशनवर लक्ष द्या. यामुळे हृदय व श्वसनाची गती कमी होते. कोर्टिसोलची पातळी संतुलित राहते. यासाठी गरजेनुसार थंड पाण्याने स्नान करू शकता. सामान्य स्ट्रेचिंग वा आपल्या सोयीनुसार योग करू शकता. यात दीर्घ श्वास घेणे सर्वात प्रभावी आहे.

विचारांना री-फ्रेम करा, मंद संगीतही लाभदायक क्रोनिक पेनने ग्रस्त बहुतांश लोक रात्र होताच वेदनेबाबत विचार करून चिंतेत पडतात. यामुळे तणाव आणि एंग्झायटी वाढते. विचारांची ही मालिका तोडण्यासाठी मंद संगीत ऐका. पुस्तक वाचा, मात्र चुकूनही मोबाइल, लॅपटॉप वा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर करू नका. ही वेदना लवकरच बरी होईल असे स्वत:ला सांगा.

बातम्या आणखी आहेत...