आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही ऋतूत छातीत कफ किंवा घसादुखीची समस्या उद्भवू शकते. पण हिवाळ्यात हा त्रास खूप वाढतो. छातीत कफ जमा झाल्यामुळे कधीकधी तीव्र वेदना आणि संसर्ग होतो. विशेषत: बदलत्या ऋतूत लहान मुले आणि वृद्धांना याचा त्रास होतो. अशा वेळी छातीतील जुना कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणे आवश्यक ठरते.
छातीत जमा झालेला कफ हे अनेक समस्यांचे मूळ
छातीत कफ किंवा श्लेष्मा जमा झाल्यामुळे रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे, तीव्र खोकला येणे, छाती जड होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. बाजारात अनेक कफ सिरप उपलब्ध आहेत. परंतु जुना कफ काढण्यासाठी हे गुणकारी नाहीत.
कफ हा त्रिदोषांपैकी एक
आयुर्वेदाचार्य अभिषेक उपाध्याय स्पष्ट करतात- आयुर्वेदात आरोग्याच्या तीन दोषांचा उल्लेख आहे. कफ देखील यापैकी एक आहे. सर्व रोग या तीन दोषांमुळे होतात. ते दोष म्हणजे 'पित्त, वात आणि कफ'. अशा स्थितीत सामान्य कफ देखील एकापेक्षा जास्त आजारांना कारणीभूत ठरू शकतो. मात्र, हे टाळण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपचार घरगुती आहेत. घरातील दूध, हळद, मध, ज्येष्ठमध, कोमट पाणी, पुदिन्याचा रस, आले, तुळस आणि काळी मिरी यांचा वापर करून उपचार करू शकता.
पुदिन्याच्या रसाची वाफ घेतल्यास मिळेल आराम
पुदिन्याच्या रसाची वाफ छातीतील जुना कफ काढण्यासाठी गुणकारी आहे. यासाठी एक कप गरम पाण्यात पुदिन्याच्या रसाचे काही थेंब मिसळा. दिवसातून दोन ते तीन वेळा त्याची वाफ श्वासात घ्या. यामुळे जुना कफ बाहेर पडण्यास सुरुवात होईल आणि छातीला आराम मिळेल.
तुळशीचा काढा फायदेशीर
कफ नाहीसा करण्यासाठी काढा अत्यंत उपयुक्त मानला जातो. अभिषेक उपाध्याय यांच्यानुसार, आले, ओवा आणि काळी मिरी उष्ण गुणधर्मीय आहेत. यासोबतच तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. या सर्व गोष्टी एकत्र करून हा काढा घेतल्यास खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
तुळस-अद्रकाचा चहा
तुम्हाला काढा आवडत नसेल तर तुम्ही चहा पिऊन कफ नष्ट करू शकता. पण यासाठी तुम्हाला तुमच्या चहामध्ये आले आणि तुळस घालावी लागेल. साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
मधाचे पाणी गळ्यातील वेदना दूर करेल
कधीकधी कफमुळे घसा खवखवतो. ज्यामुळे बोलणेही कठीण होते. हे टाळण्यासाठी मध हा रामबाण उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्यानेही दुखणे आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. यामुळे वजनही कमी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.