आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात वाढली आहे कफाची मात्रा:हिवाळ्यात छातीतील कफ दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील प्रभावी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ होणे ही सामान्य समस्या आहे. त्याशिवाय हिवाळ्यात सर्वांत जास्त समस्या निर्माण होते, ती म्हणजे घसा आणि छातीत चिकट कफ तयार होतो. कफामुळे घशास त्रास होतोच; पण इतरही काही त्रास होत राहतात. कफाच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि सिरप यांचे सेवन केले जातेे. काही वेळा आराम मिळतो; पण काही वेळा मात्र लवकर आराम मिळत नाही. त्यामुळे हे काही उपाय करून पाहा.

वाफ घ्यावी
कफची समस्या दूर करण्यासाठी वाफ घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. वाफेची उष्णता घसा आणि नाकातून शरीरात गेल्यावर श्लेष्माचे विघटन होण्यास मदत होते. कफ झाल्यास तज्ञ दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेण्याचा सल्ला देतात.

मध आणि लिंबू
एक चमचा सेंद्रिय मध आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून प्यावे. त्यामुळे घशाला आराम मिळतो आणि कफ साठण्याची समस्या दूर होते. मधामध्ये जीवाणूरोधक आणि बुरशीरोधक गुण असतात. लिंबामध्ये 'सी' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे घशाला त्वरित आराम मिळतो.

काळी मिरी
काळी मिरी थोडी तिखट आणि कडूसर चवीची असते; पण वातदोष कमी करण्यात काळी मिरीचा फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदात काळी मिरी चमत्कारी औषध असल्याचे मानले जाते. त्यामुळे कफ कमी होतो. काळ्या मिरीमध्ये पाईपर लांगमाईन म्हणजेच 'पीएल' नावाचा रासायनिक घटक असतो. त्यामुळे शरीरात एन्झाइम्स तयार होण्यापासून रोखते. शरीरात तयार होणारे एन्झाइम्स खोकला आणि त्याचा संसर्ग वाढवितात, जे कफ तयार होण्याचे कारण ठरते. रोज एक कप पाण्यात २0 मिरीचे दाणे उकळून त्यात मध टाकून प्यावे.

पुदिन्याचे तेल
आरोग्य तज्ज्ञानुसार पुदिन्याचे तेल छातीत साचलेला कफ काढून टाकण्यास नैसर्गिकरित्या मदत करते. गरम पाण्यात तेलाचे तेलाचे काही थेंब टेकवत आणि वाफ घ्यावी.

द्राक्षाचा रस
द्राक्षाचा रस अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. त्यात हेरास्टिलवेन नावाचा पदार्थ असतो. त्यात भरपूर प्रमाणात ॲण्टिऑक्सिडंट्स असतात. द्राक्षामध्ये एक्सपेक्टोरेंट असते. हा घटक छातीतील कफ काढून टाकण्यास मदत करतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यासाठी द्राक्षाच्या रसात २ चमचे मध घालून रोज प्यावे. असे केल्यास कफ बाहेर पडण्यास मदत होते. द्राक्षाच्या रसात मीठ, काळी मिरी मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

अद्रक
यामध्ये अँटी-इफ्म्लेमेट्री असतात जे अनुनासिक परिच्छेद साफ करतात. यामध्ये असलेले घटक शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. घशातील श्लेष्मा कमी करण्यासाठी आले किसून त्यात लिंबाचा रस मिसळा. याशिवाय आल्याचा चहाही पिऊ शकता.

पाणी पीत राहावे
कफ झाल्यास कोमट पाणी पीत राहावे. त्यामुळे घशात निर्माण होणाऱ्या कफाचे प्रमाण कमी होते. लिंबूूपाणी किंवा लेमन टीसारखे पेय पिऊन शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवू शकता, तसंच घसाही ओलसर राहण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. घशात जमा झालेला कफ हटण्यास मदत होते. घशातील जीवाणू मरतात.

हळद
कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळावी. हळदीत क्युरक्युमिन नावाचा घटक असतो. हळदीमध्ये जीवाणू प्रतिबंधक गुण असतात. त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते.

बातम्या आणखी आहेत...