आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले:100 ग्रॅम पालकातून मिळेल 34% व्हिटॅमिन C, मेथी-मोहरीही पोषणमूल्यांनी भरपूर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. तसे पाहिल्यास पालक दुसऱ्या ऋतुत मिळतोच. मात्र हिवाळ्यात याची उपलब्धता जास्त असते. पालकच नव्हे तर मेथी, मोहरी, राजगिरा, हरभऱ्याची पाने बाजारात सहज मिळतात. याच हिरव्या भाज्यांविषयी जाणून घेऊया ज्या पोषणमूल्याने भरलेल्या आहेत.

हिरव्या भाज्या हा एक संतुलित आहार आहे. एकीकडे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि दुसरीकडे फॅट आणि कमी कॅलरी. हिरव्या भाज्यांत व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6, फोलेटस आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. हे आपल्या शरीरात न्युरोट्रान्समीटर्स तयार होणे आणि त्यावर प्रोसेस करण्यासाठी महत्वपूर्ण असतात.

पोषणतज्ज्ञ प्रिती देसाई यांनी 'पॉवर प्ले ऑफ लिफी ग्रीन्स' हे पुस्तक लिहिले आहे. त्या सांगतात की, प्रत्येक व्हिटॅमिनचे वेगळे मेकॅनिझम असते. ज्यामुळे तणाव कमी होतो. सोबतच हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमही असते. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे चिंता विकार जडतो. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे.

सर्वाधिक गुणकारी आहे पालकाची भाजी

आहारतज्ज्ञ डॉ. विजय श्री प्रसाद सांगतात की, पालकाचा आहारात समावेश केल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. कर्करोगाचा धोका कमी होतो आणि हाडे मजबूत होतात. यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे अनेक फायदे आहेत.

एक कप पालकमध्ये हे असते

  • 7 कॅलरी
  • 0.86 g प्रोटीन
  • 29.7 mg कॅल्शियम
  • 0.81 g लोह
  • 24 mg मॅग्नीशियम
  • 167 mg पोटॅशियम
  • 141 mcg व्हिटॅमिन A
  • 58 mcg फोलेट

स्रोतः medicalnewstoday.com

डॉ. विजयश्री प्रसाद सांगतात की, पालकात व्हिटॅमिन K, फायबर, फॉस्फरस आणि थायमीन असते. यातील बहुतांश कॅलरी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमधून मिळतात. 100 ग्रॅम पालकात 28.1 mg व्हिटॅमिन C चा 34 टक्के वाटा असतो. पालकात लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन E आणि मॅग्नेशियम असते. निरोगी प्रसूतीसाठी पालकाचे सेवन करणे चांगले आहे.

पालक कसा खावाः सामान्यपणे पालकाची भाजी करून खाल्ली जाते. हे टमाटे, बटाट्यासोबत शिजवले जाते. पनीरसोबतही पालकाची भाजी होते. पालक सलाड म्हणूनही कच्चा खाल्ला जातो. पालकाचा रस, पालकाचे पराठे आणि पालक डाळीसोबतही शिजवले जाते.

मोहरीची भाजी खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो

मोहरीच्या भाजीत पोषणमूल्ये भरपूर असतात. व्हिटॅमिन A, फोलेटस, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B6 मोहरीत असते. यात कॅल्शियमसोबतच तांबे, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमही असते. डॉ. विजयश्री सांगतात की मोहरीची भाजी अँटी ऑक्सिडन्टचा चांगला स्रोत आहे. यात तीन अँटी ऑक्सिडन्ट व्हिटॅमिन A(बिटा कॅरोटीन ), व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E असते. अँटी ऑक्सिडन्ट शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. ज्या महिलांना मेनोपॉझची लक्षणे असतात त्यांच्यासाठी मोहरीची भाजी खाणे चांगले अशते. दम्याच्या रुग्णांसाठीही मोहरीची भाजी चांगली असते.

मोहरीची भाजी कशी करावीः पालकासोबतही मोहरीची भाजी बनवली जाते. यात टमाटे, हिरवी मिरची आणि अद्रकही टाकली जाते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण आहे मेथीची भाजी

मेथीची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण आहे. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C असते. मधुमेहाचे रुग्ण मेथी भाजी म्हणून खाऊ शकतात किंवा याचा रसही पिऊ शकतात. यात अमीनो अॅसिड असते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मेथीच्या भाजीमुळे अपचनाची समस्याही दूर होते.

यात फायबर भरपूर प्रमाणात असते. मोहरीसारखे यातही अँटी ऑक्सिडंट गुण असतात. मेथीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. मेथीच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात. मेथीची पाने वाटून केसांना लावल्यास केस काळे आणि दाट होतात. केसांची चमक वाढते.

मेथी कशी खावीः मेथी आणि पालकाची मिक्स भाजी बनवली जाऊ शकते. सोया, मेथी आणि बटाट्याची भाजीही चविष्ट असते.

बातम्या आणखी आहेत...