आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या महिन्यात जन्मलेले जुळे झाले 1 वर्षाचे:अवयवही विकसित झाले नव्हते, रुग्णालयात दिले आईच्या गर्भासारखे वातावरण

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुळ्या भाऊ-बहिणीचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वजन केवळ 330 ग्रॅम आणि 420 ग्रॅम होते. त्यांचा आकार मोठ्या मुश्किलीने तळहाताएवढा होता. केवळ 4 महिन्यांच्या गरोदरपणानंतर जन्मलेली मुले वाचणे कठीण वाटत होते. डॉक्टर्स म्हणाले की ते वाचण्याची शक्यता शून्य टक्के आहे. कुटुंब आणि नातेवाईकांनीही मुले वाचण्याची आशा सोडली होती.

मात्र आई आणि वडील हिंमत आरले नाही आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामुळे जुळी मुले आज पूर्णपणे चांगली आहेत. बहीण आणि भावाचे नाव आदिया आणि अॅड्रिएल ठेवण्यात आले. त्यांनी आपला पहिला वाढदिवस साजरा केला आहे. यासह गिनिज बुकात त्यांचे नाव जगातील सर्वाधिक प्री-मॅच्युअर ट्विन बेबी म्हणून नोंदवण्यात आले आहे.

वेळेच्या इतक्या आधी जन्मलेल्या बालकांची चर्चा आता संपूर्ण जगात होत आहे.

जुळ्या मुलांना सुरुवातीचे अनेक महिने रुग्णालयातच राहावे लागले.
जुळ्या मुलांना सुरुवातीचे अनेक महिने रुग्णालयातच राहावे लागले.

शरीराचे अवयव योग्यरित्या विकसित झाले नव्हते

कॅनडात राहणाऱ्या एका महिलेला गरोदरपणात 22 व्या आठवड्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. सामान्यपणे गरोदरपणाचा कालावधी 40 ते 42 आठवड्यांचा असतो. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टर्स म्हणाले की दोघांपैकी कोणतेही मूल वाचणे कठीण आहे. त्यांनी सांगितले की मुलांचे अवयव योग्यरित्या विकसित झालेले नाही. मग ते दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथेही डॉक्टरांनी हेच सांगितले.

एकामागोमाग एक अनेक रुग्णालयांनी हात वर केले. मात्र टोरंटोतील एका रुग्णालयाने दोन्ही मुलांना वाचवण्याचा निर्णय घेतला.

बाहेरही मिळाले आईच्या गर्भासारखे संरक्षण

फक्त 22 आठवड्यांच्या गरोदर कालावधीनंतर जन्मलेल्या मुलांनी दीर्घ काळ रुग्णालयात घालवला. सुरुवातील त्यांचे डोळेही झाकून ठेवले जात होते. कारण ते योग्यरित्या विकसित झाले नव्हते. याशिवाय त्यांचे नाजुक अवयवही खास प्लास्टिकमध्ये लपेटण्यात आली होती. जेणेकरून त्यांना आईच्या गर्भासारखे संरक्षण मिळेल.

अनेकदा जीव जाता-जाता वाचला

जुळ्या मुलांचे वडील केव्हिन नाडराजांनी सांगितले की एक वर्षादरम्यान अनेकदा असेही वाटले की दोन्ही मुले वाचणे आता कठीण आहे. अनेकदा त्यांचा जीव जाता-जाता वाचला. गंभीर आजार असूनही दोघांनी मृत्यूसा चकवा दिला.

हळूहळू दोन्ही भाऊ-बहीण बरे व्हायला लागले. त्यांचा विकासही सामान्य मुलांसारखा होऊ लागला. ते स्वतः आईचे दूधही प्यायला लागले. यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

आजही डॉक्टर्सच्या निगराणीत राहतात

रुग्णालयातून घरी परतून आणि वर्ष पूर्ण केल्यानंतर आदिया आणि अॅड्रिएलला डॉक्टर्सच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. त्यांची नियमित तपासणी केली जाते. अॅड्रिएलला अनेकदा श्वास घ्यायला त्रास होतो.

ही बातमीही वाचा...

व्हायग्रा देऊन मुलांशी संबंध ठेवताहेत दहशतवादी महिला:कुणी दहशतवादासाठी देश सोडला, तर कुणी शिक्षकाची नोकरी सोडली

बातम्या आणखी आहेत...