आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सेवा परीक्षा तयारी:नोकरीदरम्यान 5 तासांचा अभ्यास करून देऊ शकता यूपीएससी, तयारीसाठी अभ्यासाची विभागणी करा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससी, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहेच, शिवाय तयारीसाठीही बराच वेळ लागतो. तीन टप्प्यांत होणाऱ्या या परीक्षेच्या तयारीसाठी सरासरी दोन वर्षे लागतात. आर्थिक परिस्थिती व अनेक जबाबदाऱ्यामुळे बरेच तरुण या परीक्षेसाठी फुल टाइम तयारी करू शकत नाहीत. मात्र काही उमेदवार नोकरी करून या परीक्षेची तयारी करतात आणि अभ्यास करतात आणि यश मिळवतात. त्यामुळे येथे काही टिप्स देण्यात येत आहेत, त्याचा अवलंब करत तुम्ही नोकरी करता-करता अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवू शकता.

तयारीसाठी अभ्यासाची विभागणी करा..
सकाळी २ ते ३ तास अभ्यास करावा. त्यानंतर संध्याकाळी वाचावे. ऑफिसमध्ये कामानंतर होणाऱ्या थकव्यानंतर ५ ते ६ तास अभ्यास करणे अवघड असते. त्यामुळे ज्या कंपनीची वेळ ठरलेली आहे तीच कंपनी निवडावी. म्हणजे कंपनीचा वेळ ८ ते ९ तास आणि आठवड्यात दोन सुटी मिळत असेल.

पोमोडोरो तंत्राची मदत घेऊ शकता
दर २५ मिनिटाच्या अभ्यासानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. तुम्हाला अभ्यासाचा हा क्रम चार वेळा करावा लागेल. चौथे टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला १५ मिनिटांचा दीर्घ ब्रेक घ्यावा लागेल. यामुळे उमेदवारांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित राहते. आठवड्याच्या शेवटी तुम्ही १० तास अभ्यास करू शकता.

बातम्या आणखी आहेत...