आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या वर्षी भारतात टिकटॉकला बंदी घातल्यापासून अनेक लोक याला मिस करत आहेत. जागतिक स्तरावर याची ख्याती पाहून 17 वर्षीय सायना सोढीने भारतीय वापरकर्त्यांसाठी हे अॅप सुरू केले आहे. साइना यूकेमध्ये राहते. साइनाने सांगितले- 'टिकटॉक एक मजबूत सोशल नेटवर्किंग साइट आहे. परंतु मला नेहमीच या अॅप्लिकेशनची भारतीय आवृत्ती हवी होती. म्हणूनच मी हे अॅप लाँच केले आहे.' सायनाने हे अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी बम्बल सारख्या वेबसाइटचा वापर केला. पण लवकरच तिला समजले की त्याद्वारे ती टिक-टॉक सारखी वैशिष्ट्ये तयार करण्यास सक्षम होणार नाही.
त्यानंतर सायनाने स्वत: ची 'द सायना कॉर्पोरेशन' ही कंपनी सुरू केली. या मुलीने तिच्या अॅपला ठीक-ठाक हे नाव दिले. जेव्हा या स्वतंत्र प्रकल्पासाठी तिला कोणत्याही कॉर्पोरेट वकीलाचे समर्थन मिळाले नाही तेव्हा तिने इतर खासगी कंपन्यांकडे पाहत आपले खाजगी धोरण व अटी व शर्ती तयार केल्या. मागील वर्षी जानेवारीत त्याचे मूळ मॉडेल तयार केल्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये तिने हे अॅप विकसित केले. या अॅपमध्ये व्हिडीओ अपलोडिंग, व्हिडिओ एडिटिंग टूल्स, सोशल शेअरींग आणि साऊंड या सुविधाही आहेत, असे साइनाने सांगितले.
याशिवाय हे अॅप ठीककोड स्कॅनर आणि जिओलोकेशन रिएक्शन सर्व्हिस देखील प्रदान करते. याचे लेटेस्ट व्हर्जन मार्चमध्ये लाँच केले जाईल. हे अॅप्लिकेशन सध्या आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये गुजराती आणि तामिळ भाषांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.