आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रोफेशनल जगतात पाऊल ठेवल्यानंतर सर्वांनाच वाटते की, आपण एक दिवस मोठ्या पदावर पोहोचू किंवा मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू, मात्र तुम्हाला माहिती आहे का? की असे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्ही, उदार, शांत आणि विश्वासू राहाल. नुकतेच कार्यालयातील व्यवहराराविषयी झालेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे.
संधोधनानुसार, कार्यालयात, कपटी किंवा आक्रमक लोक मोठ्या पदावर जाण्याची शक्यता कमी असते, तर लोकांच्या जास्त संपर्कात राहणारे किंवा लोकांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमध्ये जास्त फायदा मिळतो.
अमेरिकेतील साइंटिफिक जर्नल प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेजमध्ये प्रकाशित संशोधनात संधोधक प्रोफेसर कॅमरन एंडरसरन, सायकोलॉजी प्रोफेसर ऑलिवर पी जॉनसन, डॉक्ट्रेट विद्यार्थी डॅरन एल शार्प्स आणि एसोसिएट प्रोफेसर क्रिस्टोफर जे सोटो यांनी कॉलेजच्या अशा विद्यार्थ्यांना 14 वर्षांनंतर ट्रॅक केले, जे भांडखोर किंवा वाईट व्यवहार असणारे होते.
त्यांनी या विद्यार्थ्यांवर दोन संशोधन केले. निष्कर्श निघाला की, मतलबी, धोकेबाज आणि आक्रमक लोकांना मोठे पद मिळण्याची शक्यता खूप कमी होती. संशोधकांनी संशोधनात सामिल विद्यार्थ्यांना त्यांचे पद, पॉवर आणि कंपन्यांच्या वातावरणाविषयी प्रश्न केले होते.
वाईट व्यवहार असलेले यशस्वी होत नाही असे नाही
संशोधक कॅमरन एंडरसन म्हणाले - 'मी संशोधनातून समोर आलेल्या गोष्टींमुळे आश्चर्यचकीत आहे. तुम्ही कोण आहात या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. वाईट व्यवहार तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटीशनमध्ये फायदा देत नाही.' ते म्हणाले की, असे नाही की, वाईट अॅटीट्यूड असणारे लोक यशस्वी होत नाही, मात्र दुसऱ्या लोकांच्या तुलनेत त्यांना यश मिळवण्यात वेळ लागतो आणि वाईट अॅटीट्यूड कोणत्याच परिस्थिती त्यांची मदत करू शकत नाही.
एंडरसन म्हणाले, 'वाईट वृत्त म्हणजे संस्था तरीही शांत लोकांप्रमाणेच वाईट अॅटीट्यूड असणाऱ्या लोकांनाही मोठ्या जबाबदाऱ्या देतात. दूसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर त्या वाईट लोकांना दुसऱ्यांच्या बरोबरीत शक्तीशाली बनण्याची संधी देतात. खराब व्यवहार असणारे लोक त्यांच्या संस्थेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात हे माहिती असूनही असे केले जाते.'
दोन्ही संशोधनांनुसार जाणून घेऊया
पहिल्या स्टडीमध्ये संशोधकांनी 457 लोकांना सामिल केले आणि त्यांना ऑफिसमध्ये ताकद आणि वाईट व्यवहारामध्ये काहीच संबंध आढळला नाही. तर दूसऱ्या संशोधनात संशोधकांनी सामर्थ्य वाढवण्याच्या चार मुख्य पद्धती तपासल्या.
या पद्धतींमध्ये आक्रमक वर्तन किंवा धमकावणे आणि गुंडगिरीचा वापर करणे, राजकीय वर्तणूक किंवा प्रभावशाली लोकांबरोबर काम करणे, जातीय वर्तन किंवा इतरांना मदत करणे, स्पर्धात्मक स्वभाव किंवा कामात चांगले असणे यांचा समावेश होता.
त्यांनी संशोधनात सामिल लोकांच्या सहकाऱ्यांनाही रेटिंग करण्यास सांगितले. यानंतर संशोधकांना कळले की, वाईट व्यवहार करणारे लोक का दूसऱ्यांच्या तुलनेत लवकर यश मिळवू शकत नाही.
5 टिप्स ज्या कामाचे सामर्थ्य वाढवण्यात मदत करु शकतात
वर्कप्लेसवर चांगले वातावरण निर्माण करणे खूप आवश्यक आहे. यामुळे कार्यालयात मजबूत रिलेशन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यात मदत मिळते. उदारतेने प्रोडक्टिव्हिटी, मोटिव्हेशन आणि चांगले वातावरण निर्माण होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.