आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Never Repeated A Dress, Always Wore Gloves; Bright Colored Hats Became A Distinct Identity

शाही रंग लाल, तरी महाराणीला आवडायचे निळे कपडे:कायम हातमोजे घातले; ब्राइट रंगांच्या हॅट्स ठरली वेगळी ओळख

ऐश्वर्या शर्मा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी रात्री जगाचा निरोप घेतला. 96 वर्षीय राणीने 70 वर्षे ब्रिटनचे सिंहासन सांभाळले. त्या कायमच स्टाईल आयकॉन राहिल्या आहेत. त्यांनी अवलंबलेली ड्रेसिंग स्टाईल ट्रेंड बनली. त्यांच्या टोपीपासून ते पादत्राणांपर्यंत सर्व काही अद्वितीय आणि खास होते.

सर्व प्रथम, आपणास त्या युगात विचार करुयात जेव्हा जेव्हा महाराणी एलिझाबेथ द्वितीय एलिझाबेथ अलेक्झांडर मेरी होत्या.

एलिझाबेथचा जन्म लंडनमध्येच झाला होता. त्या किंग जॉर्ज सहावा यांचे पहिले अपत्य होत्या. त्या 21 वर्षांच्या असताना प्रिन्स फिलिपशी त्यांचे लग्न झाले होते. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्या प्रिन्स फिलिपच्या प्रेमात होत्या.

राणीच्या वेडिंग गाऊनवर होते 10 हजार मोती

20 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांचा विवाह झाला तोपर्यंत भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. त्यांच्या वेडिंग गाऊनच्या त्यावेळी अनेक बातम्या छापून आल्या होत्या. त्याची चर्चा भारतात देखील होती. हा फ्लोरल पॅटर्नचा गाउन इंग्लंडच्या नॉर्मन हार्टनेलने 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत डिझाइन केला होता.

हा गाऊन 'डचेस स्टिन'ने बनलेला होता. तसेच इटालियन 'बोटेली पेंटिंग'ने प्रेरित होता. या गाऊनसाठी अमेरिकेतून 10 हजार छोटे मोती आयात करण्यात आले होते.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, एलिझाबेथला हा गाऊन तिच्या लग्नाच्या दिवशीच मिळाला होता. म्हणूनच तो आधी ट्राय करता आला नाही. विशेष म्हणजे महाराणीने कधीच त्यांच्या कोणत्याही ड्रेसवर सेफ्टी पिन वापरली नाही.

महाराणीचा विवाह लंडनमधील रॉयल चर्च वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे पार पडला.
महाराणीचा विवाह लंडनमधील रॉयल चर्च वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे पार पडला.

नेहमी ब्राइट कलरच्या ड्रेसचा वापर

जेव्हाही महाराणी सार्वजनिक ठिकाणी दिसायच्या तेव्हा त्या नेहमीच चमकदार रंगाच्या ड्रेसमध्ये दिसायच्या. राजघराण्याशी संबंधित तज्ञ डेझी मॅकअँड्र्यूच्या मते, त्यांची उंची 5 फूट 4 इंच होती. अशा स्थितीत त्यांना गर्दीत पाहणे आणि ओळखणे कठीण झाले असते. म्हणूनच त्यांच्या ड्रेस निर्मात्यांनी ठरवले की, त्यांच्यासाठी फक्त चमकदार रंगाचे कपडेच डिझाइन करायचे, जेणेकरून जेव्हा त्या लोकांसमोर येतील तेव्हा त्या वेगळ्या दिसतील.

शाही रंग लाल होता, परंतु राणीने निळे कपडेच जास्त घातले

2012 मध्ये, वोग मासिकाने सांगितले की, राणी बहुतेक निळ्या ड्रेसेजमध्ये दिसते. तथापि, राणीचा असा विश्वास होता की शाही रंग लाल आहे. राणीची वरिष्ठ ड्रेस डिझायनर अँजेला केली यांनी तिच्या ‘The Other Side of the Coin: The Queen, the Dresser and the Wardrobe’ या पुस्तकात लिहिले आहे की, ती कुठेही फिरली तरी ती राजघराण्यातील राणीसाठी स्थानिक फॅब्रिक खरेदी करत असे. केलीचा असा विश्वास होता की, दिवसा चमकदार रंग चांगले दिसतात आणि महाराणी तिच्या चमकदार ड्रेसिंग सेन्सने हितचिंतकांमध्ये एक वेगळे आकर्षण निर्माण करते.

राणीने कधीही ड्रेस परत वापरला नाही, तो डिझाइनरना भेट देत असे

2011 मध्ये ब्रॅन हो यांनी राणीच्या जीवनावर ‘Not in Front of the Corgis’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये त्याने खुलासा केला की, एकदा ड्रेस घातल्यानंतर राणी एलिझाबेथ पुन्हा तो परिधान करत नव्हत्या. जो ड्रेस त्या परिधान करत तो ड्रेस निर्मात्यांना परत करत असे. विशेष म्हणजे हा ड्रेस डिझायनर्सना स्वतः परिधान करण्याचा किंवा पुढे विकण्याचा अधिकार दिलेला होता. मात्र, त्यासाठी एक अटही होती की, ड्रेसवरुन राजघराण्याचे लेबल काढून टाकले जावे. आणि महाराणीने हा पोशाख घातल्याचे कुठेही नमूद करता येणार नाही. वास्तविक, मीडिया लाइम लाईट टाळणे हे त्यामागचे कारण होते. कारण महाराणीचा ड्रेस नेहमीच मीडियात चर्चेचा विषय असायचा.

बहुतेक गाऊनमध्ये दिसल्या, नंतर स्टाईल बदलली

राणीला गाऊन आवडते हे राजघराण्यातील प्रत्येकाला माहीत होते. 1954 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी पांढऱ्या रंगाचा लेस गाऊन घातला होता, तर दुसऱ्या दिवशी हिरवा गाऊन घातला होता. 1958 मध्ये त्या नेदरलँड दौऱ्यावर निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसल्या होत्या. राष्ट्रपतींची भेट असो किंवा जनतेची भेट असो, त्या बहुतेकक गाऊनमध्येच दिसत होत्या.

जेव्हा महाराणी तरुण होत्या तेव्हा फुलांचे आणि पोल्का डॉट प्रिंटचे कपडे घालायच्या, पण नंतर त्यांनी प्लेन ड्रेसला स्टाइल बनवली. यानंतर त्यांनी स्टॉकिंग्जही आपलेसे केले. मात्र, त्यांनी कधीही गुडघ्यापेक्षा वर जाणारा स्कर्ट घातला नाही.

महाराणी एलिझाबेथने तिच्या हनिमूनला पहिल्यांदा हातमोजे घातले होते. महाराणी दिवसभरात 5 ते 7 कपडे बदलत होत्या.
महाराणी एलिझाबेथने तिच्या हनिमूनला पहिल्यांदा हातमोजे घातले होते. महाराणी दिवसभरात 5 ते 7 कपडे बदलत होत्या.

संसर्ग टाळण्यासाठी नेहमी हातमोजे घातले

महाराणीच्या हातात कायम हातमोजे दिसत होते. यामागेही एक कारण होते. त्यांची स्टाईल ड्रेसर अँजेला केली यांनी सांगितले की, महाराणीला दिवसभर अनेक लोकांना भेटावे लागेत होते. तसेच अनेक लोकांशी हस्तांदोलन करावे लागत होते. अशा परिस्थितीत त्यांना कोणताही संसर्ग होवू नये, म्हणून त्या नेहमी हातमोजे घालत होत्या.

राणी एलिझाबेथच्या स्टाईलमध्ये होत्या ब्राइट कलर हॅट्स

महाराणीची टोपीही फक्त भडक रंगाचीच असायची. ड्रेसप्रमाणेच यामध्येही तोच तर्क होता, की, त्या गर्दीतही उठून दिसायला हव्यात. त्याची प्रत्येक टोपी ड्रेसच्या रंगाशी जुळलेली असायची. त्यांची टोपी कधी फ्लोरल प्रिंटची तर कधी प्लेन रंगाची होती. त्या नेहमी Gossamer Tudor Hats, Buckle-Front Bulbous Hat, Polka Dot Turban, Fox-Fur Cossack Hat, Balmoral Hat, Western Cowboy Style हॅटमध्ये दिसत होत्या.

बॉक्स बँग शिवाय स्टाईल अपूर्ण होती

तुम्ही महाराणीच्या हातात नेहमी बँग पाहिली असेल. त्याला बॉक्स हँडबॅग म्हणतात. 1950 पासून महाराणी नेहमी यूके-आधारित कंपनी लॉनरच्या बॉक्स बॅग वापरत होत्या.

‘Elizabeth the Queen: The Woman Behind the Throne’ च्या लेखिका सॅली बेडेल स्मिथच्या दाव्यानुसार, महाराणीने नेहमी त्यांच बॅग मध्ये लिपस्टिक, एक छोटा आरसा, रुमाल आणि त्यांचा चष्मा ठेवत होत्या.

हिऱ्यांनी जडवलेला ब्रोच होता राणीची आवड

जर तुम्ही लक्षात ठेवले असेल तर महाराणी ड्रेसवर कायम ब्रोच दिसत होता. त्यांच्याकडे सुमारे 100 ब्रोचेस होते. त्यांचे सर्वात खास ब्रोच हाताने बनवलेले होते, ज्यावर गुलाबाचे फूल बनवले होते. तर आजूबाजूला 100 हून अधिक हिरे जडलेले आहेत. हा ब्रोच त्यांच्या आईने दिलेला होता.

तीन पदरांचा मोत्याचा हार खास होता

क्वचितच असे घडले आहे की, त्या तीन पदरांच्या मोत्यांच्या माळेशिवाय लोकांमध्ये आल्या. वास्तविक हा मोत्यांचा हार त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ होता. त्या हारासह राणीचे प्रत्येक चित्र तुम्हाला सापडेल.

हा हार त्यांना वडील किंग जॉर्ज सहावा यांच्याकडून मिळाला होता. राणीने वयाच्या 25 व्या वर्षी वडील गमावले. तेव्हापासून तो तो हार नेहमी आपल्याजवळ ठेवायच्या. यावरून त्यांचे वडिलांशी असलेले घट्ट नातेही दिसून येते.

राणीच्या दागिन्यांच्या संग्रहात 300 हून अधिक वस्तू होत्या. यामध्ये सुमारे 100 ब्रोचेस, 46 नेकलेस, 37 ब्रेसलेट, 34 कानातले, 15 अंगठ्या, 14 घड्याळे आणि 5 पेंडंटचा समावेश होता.

50 वर्षांपासून समान शैलीतील पादत्राणे परिधान केले

राणी एलिझाबेथचे पादत्राणेही खास होते. त्या फक्त लोफर्स, सँडल आणि बूटमध्ये दिसत होत्या, परंतु त्यांनी सर्वात आधी लोफर्स निवडले.

गेल्या 50 वर्षांपासून त्या एकाच स्टाईलच्या फुटवेअरमध्ये दिसत होत्या, हे जाणून आश्चर्य वाटेल. राणीच्या पादत्राणांसाठी लंडनस्थित पादत्राणे कंपनी Anello & Davide यांची खास नियुक्ती करण्यात आली होती. शू मेकर डेव्हिड हयात यांनी महाराणीसाठी लेदर फूटवेअर डिझाइन केले. राणीच्या पादत्राणांची टाच अडीच इंच होती.

बातम्या आणखी आहेत...