आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Chinese People Started Singing 'Jimmy Jimmy |Tanzania's Kylie Paul Became A Star By Lip Smacking Bollywood Songs | Marathi News

'जिमी-जिमी' गाऊ लागले चायनीज लोक:टांझानियाचा पॉल बॉलिवूड गाण्यांची लिप्सिंग करून बनला स्टार, नॉर्वेच्या लग्नातही देशी गाण्यावर डान्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता चीनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोट्यवधी लोक त्यांच्या घरात बंद आहेत. अत्यावश्यक कामासाठीही त्यांना बाहेर पडू दिले जात नाहीये. अशा परिस्थितीत सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी चिनी लोकांनी नवा फॉर्म्युला आणला आहे. या निषेधात चिनी लोक आपल्या प्रियजनांचे कठीण काळातही मनोरंजन करत आहेत.

बॉलिवूड गायक बप्पी लाहिरी यांचे 'जिमी-जिमी' हे गाणे सध्या चिनी सोशल मीडिया साइटवर चांगेलच व्हायरल होत आहे. लेहेंगा आणि साड्या परिधान केलेले चायनीज तरुण बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गाण्यांवर रिल बनवत आहेत.

'जिमी-जिमी' चा चिनी अर्थ आहे - तांदूळ द्या
मिथुन चक्रवर्तीच्या 'डिस्को डान्सर' चित्रपटातील 'जिमी-जिमी, आजा-आजा' या गाण्याचा चिनी अर्थ आहे - राइस द्या ((Jie Mi). यामुळेच लॉकडाऊनमध्ये हे गाणे चिनी लोकांच्या ओठांवर आले आहे. हातात रिकामे डबे घेऊन चिनी तरुण या गाण्याच्या मदतीने सरकार आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

जगभर लोकप्रिय होत आहेत हिंदी गाणी
बॉलीवूडची गाणी केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात लोकप्रिय होत आहेत. बॉलीवूडची गाणी त्यांच्या अनोख्या बीट्स आणि चालीमुळे जगभरात आपला ठसा उमटवत आहेत. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांसारख्या बॉलीवूड स्टार्सचे विविध देशांमध्येही प्रचंड चाहते आहेत.

देशी गाण्यांची लिप्सिंग करून स्टार बनला टांझानियाचा काइली पॉल
कायली पॉल हे आज इंटरनेटवर एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. शाहरुख खानच्या एका गाण्यावर लिप्सिंग करत पॉलने अभिनय केल्यानंतर तो जगाच्या नजरेत आला. त्याचा हा व्हिडिओ भारतात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्याने हाच आपला पेशा बनवला.

पॉल आता सोशल मीडियावर बॉलीवूडची गाणी आणि डायलॉगची ऍक्टिंग करतो. यातून त्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पॉलने भारत दौराही केला आहे. यादरम्यान तो 'झलक दिखला जा' सीझन-10 मध्ये माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना दिसला होता.

'साड्डी गली' गाण्यावर नाचताना दिसले होते नॉर्वेचे वऱ्हाडी
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ नॉर्वेतील एका लग्नातील होता. या व्हिडिओमध्ये लग्नातील वऱ्हाडी 'साड्डी गली', 'चुरा के दिल मेरा' सारख्या गाण्यांवर डान्स करताना दिसले होते.

बॉलिवूडची क्रेझ चीनमध्ये नवीन नाही
बॉलीवूडवर चीनमधील लोकांचे हे प्रेम नवीन नाही. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत चीनमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. '3 इडियट्स', 'दंगल', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांनी अलीकडच्या काळात चांगला व्यवसाय केला आहे.

चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात बॉलीवूड चित्रपटांकडे असलेला कल नक्कीच थोडा कमी झाला. परंतु अलिकडच्या वर्षांत त्याचे पुनरुत्थान झाले आहे.

राज कपूर यांनी बॉलिवूडला जगभरात लोकप्रिय केले
1950-60 च्या दशकात राज कपूर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. या काळात त्यांचे चित्रपट आणि त्यांची गाणी चीन आणि सोव्हिएत रशियामध्येही खूप आवडली होती. राज कपूर हे पहिले बॉलिवूड स्टार होते, ज्यांची गाणी आणि चित्रपट जगभर हिट झाले होते.

बातम्या आणखी आहेत...