आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाची क्रेझ कमी होत आहे:7 वर्षांपूर्वी अमेरिकेत 71% किशोरवयीन फेसबुक वापरकर्ते होते, आता 32%

वॉशिंग्टन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनरेशन झेड म्हणजेच 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले लोक आता सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर सक्रिय नाहीत. परंतू, आभासी जगाच्या मैत्रीवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे. तर 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले 26 ते 41 वयोगटातील लोक अजूनही नियमितपणे फेसबूकचा वापर करतात.

प्यू रिसर्च सेंटरच्या एका नवीन सर्वेक्षणानुसार, यूएसमधील 13 ते 17 वयोगटातील केवळ 32% किशोरवयीन मुले नियमितपणे फेसबुकचा वापर करतात. 2014-15 मध्ये 71% किशोरवयीन मुले फेसबुकचे वापरकर्ते होते. ते इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया साइट्स देखील वापरत होते. यूएस मध्ये किशोरवयीन मुले सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली घट कमी नाही झाली. गेल्या 5 वर्षांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये फेसबुकचा वापर कमी झाला.

फेसबुक डेटा लीकचा धोका

किंबहुना, गेल्या काही वर्षांत सोशल साइट्सवरून डेटा लीक होण्याच्या आणि प्रायव्हसीचा धोक अधिक प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जनरेशन झेडमध्ये सोशल मीडियाची क्रेझ कमी झाली. तसेच तरुणायींचा फेसबूकवरुन विश्वास उडाला आहे. दरम्यान, सहजतेने नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्विच करतात. Facebook ची मूळ कंपनी Meta ची इन्स्टाग्रामवर 62% किशोरवयीन आहेत, परंतु ते देखील ते नियमितपणे वापरत नाहीत. यामुळेच सोशल मीडिया कंपन्या वेगवेगळ्या फीचर्ससह नवनवीन सोशल साइट्स लॉन्च करत असतात.

फेसबूकचा अंदाज सांगतो की, येत्या काही वर्षांत फेसबुकचे यूएसमध्ये नियमित जनरेशन झेड वापरकर्ते नसतील, परंतु मागील पिढी फेसबुक वापरत राहतील. प्रोफेसर डॉ. डस्टिन यॉर्क म्हणतात - जनरेशन झेडला आकर्षित करण्यासाठी फेसबुक आणि इतर सोशल साइट्स खूप बदल करत आहेत, परंतु प्यू रिसर्च सेंटरने इंग्लंडमध्ये केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात किशोरवयीन मुलांमध्ये व्हिडिओची क्रेझ वाढत असल्याचे समोर देखील आले आहे.

भारतातील 73% मुले मोबाईल वापरतात

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल इन्व्हेस्टिगेशन अँड न्यूरोसायन्सच्या अहवालानुसार, भारतातील 73% मुले मोबाईल वापरतात. यापैकी 30% मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. 10 पैकी 3 मुले नैराश्य, भीती, चिंता आणि चिडचिडेपणाने ग्रस्त आहेत. यूकेमधील नेचर कम्युनिकेशन्सने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, सोशल मीडियाचा वापर किशोरवयीन मुलांचे मेंदू, हार्मोन्स आणि वर्तनावर परिणाम करतो.

डॉ. यॉर्क सांगतात की, 1990 च्या काळात असलेली फॅशन पुन्हा शाळा-महाविद्यालयांमध्ये पाहायला मिळते आहे. मुलांमध्ये मागाच्या पिढीच्या जुन्या आठवणींना उजळा देता आहेत. यामध्ये कपडे, संगीत किंवा सोशल मीडिया प्राधान्ये आणि सवयी असोत. तसेच मुलांना त्यांच्या आई-वडीलांच्या काळातील कपडे घालायचे आहेत. तसेच मुलांना त्यांच्या काळातील संगीत ऐकायचे आहे जे जनरेशन झेड वेळी अनेक सोशन मीडिया प्लॅटफॉर्म वापरते.

बातम्या आणखी आहेत...