आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या वेळेबाबत सतर्क राहायला हवे
वेळ वा संपत्ती खर्च केली की ती निघून वा संपून जाते. या गोष्टींची समजूतदारपणे गुंतवणूक केली की भविष्यात निश्चित लाभ होतो. जर तुम्ही एखाद्या कामासाठी जास्त वेळ देता तेव्हा दुसऱ्या कामासाठी वेळ कमी पडते. वेळेच्या उपयोगाबाबत तुमची निवड हीच जीवनाचा स्तर निश्चित करेल. आपण सर्वांनी आपल्या वेळेबाबत नेहमीच सतर्क राहायला हवे.
फेलिंग फॉर्वर्ड पराभवामुळे होतो नवा दृष्टिकोन विकसित
प्रत्येक युद्ध हे विजयाच्या इराद्यानेच लढले जाते. अफाट प्रयत्न, संघर्ष आणि विजयाचे वेड असूनही तुम्ही हरता आणि समोरचा जिंकतो तेव्हा काय करता? पराभव मोठेपणाने मान्य करणे ही मनुष्याची ओळख. पराभूत व्यक्ती आत्मपरीक्षण करू शकते. विजयाहून जास्त पराभव शिकवत असतो. पराभव आपल्याला मानवतेकडे नेतो. पराभवामुळे नवा दृष्टिकोन तयार होतो.
द फाइव्ह पर्सनॅलिटी पॅटर्न्स प्रगतिशील बनावे...प्रगतीविरोधी नको
प्रयोगशील व्यक्ती बना. रूटीन तोडा. नव्या हॉटेलात जा. नवी पुस्तके वाचा. नव्या सिनेमागृहात जा. नवे मित्र बनवा. वेगळ्या शैलीत सुटी साजरी करा. आठवड्याच्या शेवटी काहीतरी वेगळे करा. मी नोकरी करायचो तेथे असे काम व्हायचे, येथेही तसेच करायचे आहे, असे म्हणू नका. मी नोकरी करायचो तेथे हे काम असे व्हायचे. आता अधिक चांगल्या प्रकारे करायचे आहे, असे म्हणा.
विनिंग द वॉर इन युवर माइंड आत्मविकासासाठी खास वातावरण गरजेचे
जवळपासचे वातावरण असे हवे की, त्यामुळे आत्मविकासासाठी प्रेरणा मिळावी. प्रोत्साहित करणाऱ्या लोकांसमवेत राहा. अशा लोकांसमवेत राहा जे काही करण्याचा, काही बनण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठे लक्ष्य, प्रचंड महत्त्वाकांक्षी लोक. तुमच्या जवळपासच्या वातावरणात जी भावना प्रबळ असते तिचा तुम्ही स्वीकार करत असता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.