आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Girl Gave Birth To Twins, But The Fathers Of Both Of Them Are Different In The DNA Test, Rare Pregnancy Case: Mother Gives Birth To Twins, But DNA Test Reveals Different Fathers; Learn How To...

गर्भधारणेचे दुर्मिळ प्रकरण:आईने दिला जुळ्या मुलांना जन्म , पण DNA चाचणीत दोघांचे वडील मात्र वेगवेगळे; जाणून घ्या कसे ...

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलच्या मिनिरोस येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका 19 वर्षांच्या मुलीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, विशेष बाब म्हणजे या जुळ्या मुलांचे वडील मात्र वेग वेगळे आहेत. मुलांच्या जन्मानंतर 8 महिन्यांनी DNA टेस्ट केल्यानंतर हा खुलासा झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण अत्यंत दुर्मिळात दुर्मिळ असाच आहे आणि जगात केवळ अशा 20 प्रकरणे समोर आली आहेत. .

आईचे एकाच दिवशी दोन पुरुषांशी ठेवले होते संबंध

DNA टेस्टमध्ये खुलासा झाल्यानंतर आईने सांगितले की, तिचे एकाच दिवशी दोन पुरुषांशी संबंध ठेवले होते. मात्र, दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे आहेत हे तिला तिच्या गरोदरपणातही माहीत नव्हते. आईच्या म्हणण्यानुसार, मुले मात्र एकसारखी दिसतात, म्हणजेच ते एकसारखे जुळ्या मुलांसारखीच सेम आहेत.

जन्मानंतर, मुलांच्या वडिलांची ओळख पटवण्यासाठी, मुलीने प्रथम पुरुषाची DNA टेस्ट केली. तपासात त्या व्यक्तीचा DNA फक्त एका मुलाचाच आढळून आला. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर मुलीने दुसऱ्या पुरुषाची DNA टेस्ट केली, तर यावर दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचे दिसून आले.

हेटरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे प्रकरण आहे

तज्ञांचा असा विश्वास आहे की हे हेटरोपॅरेंटल सुपरफेकंडेशनचे (heteropaternal superfecundation) प्रकरण आहे, जी एक अत्यंत दुर्मिळ अशी स्थिती आहे. यामध्ये दोन जुळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या वडिलांचे DNA आढळून आले आहेत. महिलेचे डॉक्टर टुलियो जॉर्ज फ्रँको यांनी सांगितले की, हेटेरोपॅरेंटल सुपरफर्टिलायझेशनच्या बाबतीत, आईच्या शरीरात असलेली अंडी दोन भिन्न पुरुषांद्वारे फलित होतात. त्यामुळेच दोन्ही मुलांचा DNA सारखा नाही.

सोप्या भाषेत,आईच्या शरीरातून दर महिन्याला दोन अंडी बाहेर पडतात. जरी ते वेगवेगळ्या वडिलांच्या शुक्राणूंद्वारे फलित झाले असले तरीही मुले जुळी होतात. म्हणजेच आईच्या गर्भाशयात बाळांना वेग-वेगळ्या नाळेने जोडलेले असते. मात्र दोन्ही मुलांमध्ये आईची जनुके मात्र सारखीच असतात, पण वडिलांचे अनुवांशिक घटक वेगळे वेगळे राहतात.

बातम्या आणखी आहेत...