आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Habits Are More Powerful Than Willpower; Success Is Certain If Habits Are Formed | Marathi News

दिव्य मराठी विशेष:सवयी इच्छाशक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली असतात; सवयी अंगी बाणल्या तर यश निश्चित

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सवयी बदलता येऊ शकतात असे म्हटले जाते. पण ते एवढे सोपे नाही. चहा किंवा कॉफी पिण्याची सवय काही काळासाठी बदलणे हे जास्त कठीण नाही, पण तुम्ही अनेक आठवडे-महिने किंवा वर्षांपर्यंत तसे करू शकता का? इच्छाशक्ती कितीही मजबूत असली तरीही काही काळ गेल्यानंतर तुमच्या सवयी पुन्हा उफाळून येतात आणि पुन्हा चहा किंवा कॉफीची तलफ लागते. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया विद्यापीठाचे संशोधक असफ मझर यांनी माणसाची इच्छाशक्ती आणि सवयी यांच्यातील संबंधांवर संशोधन केले आहे. ते म्हणतात, सवयी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात. त्यांच्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे बनते, पण इच्छाशक्तीमुळे मोठे बदल होऊ शकतात. त्यासाठी सवयींवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यांच्या संशोधनातून असे आढळले की, चहा किंवा कॉफीची सवय असलेल्या व्यक्तीला थकल्यानंतर चहाची गरज भासते. थकव्यामुळे चहा-कॉफीची सवय लागली आहे असे त्याला वाटते, पण प्रत्यक्षात ती त्याची सवय आहे, ती थकव्यामुळे शरीर कमकुवत झाल्यानंतर उफाळून येते.

शिकागोच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइसच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च अँड पॉलिसीच्या संशोधनातून असे आढळले आहे की, दुकानांत सिगारेटची पाकिटे कमी दिसल्यानंतर त्यांची विक्रीही कमी झाली. म्हणजेच लोकांची तलफ कमी झाली. सवयींचा थेट संबंध आपल्या इच्छाशक्तीशी आहे. कुठलीही सवय बदलण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि ती कायम राहायला हवी. अनेक वर्षे मद्यपान सोडल्यानंतर काही लोक पुन्हा त्याकडे वळतात हे तुम्ही पाहिलेच असेल. त्यांची इच्छाशक्ती कमकुवत असल्याने असे घडते. आमचे यश आमच्या मुठीत आहे, असे अमेरिकी नागरिक नेहमीच म्हणत असतात. संशोधक असफ मझर म्हणतात की, तुम्हाला जसे व्हायची इच्छा आहे तशा सवयी स्वत:ला लावा. मग इच्छाशक्ती कमकुवत झाली तरीही लक्ष्य साध्य करता येईल.

बिहेवियरल सायंटिस्ट म्हणतात की, सवयींमुळे माणसाच्या वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि ते त्याला कळतही नाही. लहानपणातील सवयी आयुष्याचा भाग होतात. या सवयींत बदल करणे खूपच कठीण असते. लहानपणातील सवयींमुळे आपला स्वभावही निश्चित होतो.

बातम्या आणखी आहेत...