आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन हॅकर्सनी लोकांच्या संगणकांना लक्ष्य करण्यासाठी नवीन पद्धती शोधली आहे. ते आता झिप आणि रारसारख्या आर्काइव्ह फाइल फॉर्मेटमध्ये मालवेअर(एक प्रकारचे सॉफ्टवेअर जी तुमची गुप्त माहिती लिक करू शकते) टाकून लोकांना पाठवत आहे. या फाइलींमध्ये मालवेअर लपवणे सोपे असते. यामुळे अँटी-व्हायरसच्या तावडीत सापडण्याची शक्यता कमी होते.
नुकतेच एचपी वुल्फ सिक्योरिटीने केलेल्या नव्या संशोधनात समोर आले की, जुलै ते सप्टेंबरदरम्यान मालवेअर पाठवण्याच्या ४२% प्रयत्नांत झिप आणि रार फाइलचा वापर झाला. याआधी मालवेअर पाठवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आणि एक्सेल फाइलचा वापर जास्त होत होता. रिसर्च टीमचे सदस्य एलेक्स हॉलंड म्हणाले, आर्काइव्ह फाइलमध्ये लपलेले मालवेअर वेब प्रॉक्सी, सँडबाॅक्स आणि ई-मेल स्नॅनर्सपासूनही सुटले. यामुळे सायबर हल्ल्याचा शोध घेता आला नाही. अनेकदा हॅकर असे बनावट ई-मेल पाठवतात, जे एखादी मोठी कंपनी वा संस्थेकडून आल्यासारखे भासतात. अनेकदा मालवेअरच्या एचटीएमएल फाइल्सला पीडीएफसारखे बनवून पाठवले जाते. लोक जेव्ही ती उघडतात तेव्हा एक डॉक्युमेंट क्यूअर डाऊनलोड करताच संगणकात मालवेअर प्रवेश करतो. कुख्यात मालवेअर हल्ला क्वाकबोट व आइस्डआयडीत झिप व रार फाइल्सने डेटा चोरला जातो.
अज्ञात स्रोतांतील ई-मेल उघडू नका, डिलीट करा अनेकदा लोकांना डेटा चोरी झाल्यानंतर परत मिळवण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. परिणामी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे आणि डाऊनलोडमध्ये घाई करू नका. अज्ञात स्रोतांतून आलेले ईमेल उघडू नका, डिलीट करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.