आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • In Hot Summers, Cold Winters, There Are More Posts Of Hate On Social Media | Marathi News

नवा अभ्यास:तीव्र उन्हाळा, कडाक्याच्या थंडीत सोशल मीडियावर असतात द्वेषाच्या जास्त पोस्ट

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानाचा शरीरासोबत आपल्या मूडवरही परिणाम होतो. प्रचंड उकाडा किंवा रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे लोकांचा संताप अनियंत्रित होतो, संयम सुटतो. वर्तन प्रभावित होते. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, आपल्या थेट वागणुकीव्यतिरिक्त, ऑनलाइन हालचाली देखील गोंधळलेल्या आहेत. यूएसमध्ये तापमान १२ ते २१ अंश सेल्सिअस या पातळीपेक्षा जास्त किंवा कमी असते अशावेळी सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर द्वेषयुक्त भाषण वाढते.

क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, पॉट्सडॅम (पीआयके) च्या लिओनी वेन्झ यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया पोस्टचा सखोल अभ्यास केला आहे. मे २०१४ ते मे २०२० या सहा वर्षांत अमेरिकेत पोस्ट करण्यात आलेले चार अब्ज ट्विट पाहिले गेले. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अल्गोरिदम-कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित ट्विट पाहिले. संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेल्या पॅरामीटर्सवर त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांच्या मते, द्वेषयुक्त भाषण म्हणजे धर्म, वंश, नागरिकत्व, रंग, राष्ट्रीयत्व, लिंग, मूळ स्थान या आधारावर कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या संबंधात भेदभावपूर्ण आणि अपमानास्पद भाषा वापरणे. संशोधकांनी द्वेषयुक्त शब्द आणि अर्थ समजून घेण्यासाठी प्रोग्रामला प्रशिक्षण दिले.

चार अब्जांपैकी केवळ सात कोटी ५० लाख ट्विटला अल्गोरिदमने द्वेषयुक्त भाषण म्हणून वर्गीकृत केले आहे. अमेरिकेतील ७७३ शहरांमधून ट्विट पाठवण्यात आल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. ज्या दिवशी ट्विट केले गेले त्या दिवसाचे तापमान घेतले गेले. ट्विट साधारणपणे एकाच शहर किंवा प्रदेशातून आले नव्हते. तथापि, कंटेंटवर थर्मामीटरचा प्रभाव दिसून आला. १५ अंश ते १८ अंश तापमानात कमी द्वेषयुक्त ट्विट नोंदवले गेले. कडाक्याच्या थंडीत तापमान ६ अंश ते ३ अंश सेल्सिअसच्या मर्यादेत राहिल्यावर द्वेषयुक्त ट्वीट्सच्या संख्येत १२.५% ​​वाढ झाली. ४२ अंश ते ४५ अंश तापमानात भीषण उन्हाच्या तीव्रतेत द्वेषयुक्त ट्विटचे प्रमाण २२% पर्यंत वाढले.

पीआयकेमधील कॉम्प्लेक्सिटी सायन्सचे प्रमुख अँडर्स लेव्हरमन म्हणतात की, उच्चभ्रू भागातही कठोर हवामानात द्वेषयुक्त भाषण वाढले. येथील लोक वातानुकूलित आणि उष्णता कमी करण्याच्या साधनांचा वापर करण्यास सक्षम आहेत. अभ्यासानुसार, २५% अश्वेत लोक व १०% हिस्पॅनिक हे वंश-आधारित ऑनलाइन छळाचे लक्ष्य होते. या समुदायांना हवामानाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका बसतो.

मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम पीआयके संशोधक अनिका स्टेटमेसेर म्हणतात की, जेव्हा सोशल मीडिया द्वेषयुक्त भाषणासाठी लक्ष्य केले जाते तेव्हा लोकांच्या मानसिक आरोग्यास गंभीर धोका उद‌्भवू शकतो. मानसशास्त्रीय साहित्य सूचित करते की, ऑनलाइन अपमानाने तरुण व असुरक्षित गटांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. विशेषतः अभ्यासाचे लेखक सावध करतात की, मानवामुळे होणारे हवामान बदल अधिक वेगाने होत असल्याने हा धोका वाढेल. अत्यंत हवामानासारख्या घटना कधीही होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...