आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: ची मदत:इतरांना प्रेम देण्याच्या क्षमतेमध्ये करा वाढ

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकारात्मक विचारांची शक्ती दु:खावरील औषध म्हणजे इतरांना आनंदी करणे प्रेम केवळ वाटण्याने वाढते. ते देऊनच तुम्ही स्वतःसाठी प्रेम मिळवू शकता. तुम्ही जितके प्रेम व्यक्त करता तितके प्रेम तुम्हाला मिळते. प्रेम अशी गोष्ट आहे ज्याची सुरुवात तुम्ही करता. जर तुम्ही प्रेम दिले तर तुम्हाला ते मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे लोकांप्रती प्रेम आणि दयाळूपणा व्यक्त करण्याची तुमची क्षमता वाढवणे ही तुमची जबाबदारी आहे.

स्पष्टपणे विचार करण्याची कला मानसिक दृष्टिकोनच जीवनाला आकार देतो तुमचा मानसिक दृष्टिकोनच आयुष्याला आकार देताेे. प्रत्येक गोष्ट विधायक पद्धतीने पाहण्याची सवय लावा. जीवनाकडे संशय आणि अनिश्चिततेने पाहू नये. तुमच्या बाबतीत फक्त सर्वोत्तम होईल यावर विश्वास ठेवण्याची सवय लावा. मनातून समृद्धी सुरू होते. वंचित राहण्याची आणि संभाव्य अपमानाची भीती लोकांना त्यांच्या इच्छित गोष्टी साध्य करण्यापासून रोखते.

आपले जीवन बरे करू शकता व्यग्र राहाल तर दुःखी व्हायला वेळ नाही तुम्ही सर्वांना संतुष्ट करू शकत नाही. तुमच्यावर टीका होऊ देऊ नका. तुम्हाला जे करण्यात आनंद आहे ते करा. वास्तवापेक्षा काल्पनिक गोष्टी सहन करणे कठीण आहे. तुमचा राग पोसू नका. अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला दुःखी करतात. एकाधिक अावडी जाेपासा. नेहमी कशात तरी व्यग्र रहा. व्यग्र व्यक्तीला दुःखी होण्यासाठी वेळ नसतो.

बातम्या आणखी आहेत...