आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Johnson & Johnson Controversy; Know Talcum Powder Lawsuits And Side Effects, Experiments On Rats Showed That Talcum Powder Was Dangerous: It Passed Through The Skin Into The Blood, Caused Cancer Of The Uterus And Lungs​​​​

उंदरांवर केलेल्या प्रयोगात टाल्कम पावडर घातक असल्याचे दिसून आले:त्वचेतून रक्तात पोहोचते, गर्भाशय आणि फुफ्फुसाचा होतो​​​​​​​ कर्करोग

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 52 वर्षीय डार्लीन कोकरला हे माहित आहे की ती आता फार काही दिवस जगणार नाही. कारण तीला मेसोथेलियोमा नावाचा घातक कर्करोग झाला आहे आणि या आजारामुळे तिच्या फुफ्फुसासह शरीराचे इतर भागही खराब झाले आहेत.

यातना सहन करतानाच ती प्रत्येक श्वासासाठी लढतीये. आज तिला माहित आहे की तीला मिळालेली ही कॅन्सरशी भेट, या वेदना तिच्या शरीराला ताजेपणा आणि सुगंध येण्यासाठी लावणाऱ्या टाल्कम पावडरमुळे मिळाली आहे. शरीराला मिळणारा ताजेपणा आणि येणारा सुगंध मिळवण्यासाठी तिला आज एवढी मोठी किंमत मोजावी लागेल हे तीला माहित नव्हते.

याला सर्वांसाठी जबाबदार कोण, हे सुद्धा तिला त्यावेळी माहीत नव्हते. आज तिला कळले की तिला ज्या आजाराची लागण झाली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे टाल्कम पावडरमध्ये असलेले धोकादायक 'अ‍ॅस्बेस्टॉस'.

डार्लीन अ‍ॅस्बेस्टॉस'.च्या संपर्कात कशी आली? यासाठी त्यांनी त्यांचे 'पर्सनल इंज्युरी वकील' हर्शेल हॉबसन यांच्याशी चर्चा केली. त्याने डार्लिनच्या घरी भेट दिली, जिथे त्यांना जॉन्सन अँड जॉन्सन पावडर ठेवलेली आढळली.

हॉबसनला त्यांच्या आधीच्या प्रकरणांवरून हे माहीत होते की जेव्हा जमिनीतून टाल्क काढला जातो तेव्हा त्यात अ‍ॅस्बेस्टॉस'.देखील असतो, त्यात कार्सिनेजन (carcinogen) मिसळलेले असते जे कर्करोगास कारणीभूत होतो.

यानंतर डार्लीन कोकर यांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही गोष्ट 1999 ची आहे. ती अशी महिला होती जीने घातक टॅल्कम पावडरविरोधात आवाज उठवली. तोपर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेला (WHO)'अ‍ॅस्बेस्टॉस'. किती धोकादायक असू शकते हे देखील माहित नव्हते.

ही गोष्ट आम्ही तूम्हाला का सांगत आहोत त्याचे कारण म्हणजे टाल्कम पावडर वापरण्यापूर्वी तुम्ही एकदा नक्की विचार करा. कारण हे सर्व वयोगटातील लोक वापरतात. लहानपणी तुमच्या आईने तुम्हाला कधीतरी टाल्कम पावडर लावली असेल कारण ती प्रत्येक घराची गरज असते.

घाम येत असेल तर लावा, खाज किंवा पुरळ असेल तर लगेच पावडर लावा. ब्युटी पार्लरमध्ये थ्रेडिंग आणि वॅक्सिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला पहिल्यांदा टाल्कम पावडर लावली जाते.

जर तुम्ही टाल्कम पावडर लावली नसेल, तर ती कॅरम खेळताना क्ररमबोर्डवर नक्की तूम्ही टाकले असणारच. म्हणजेच टाल्कम पावडरचा आपल्या आयुष्यात इतका समावेश आहे की त्याशिवाय आपल्याला ताजेपणा जाणवतच नाही.

तो टैल्कम पाउडर की जरूरत कब और कैसे पड़ी। इसके लिए आपको चलना होगा प्राचीन मिस्र में। लेकिन इससे पहले आपको बताते हैं टैल्क शब्द कहा से आया।

मग टाल्कम पावडरची गरज कधी आणि कशी निर्माण झाली? यासाठी तुम्हाला प्राचीन इजिप्तमध्ये जावे लागेल. पण त्याआधी आम्ही तूम्हाला सांगतो की हा टाल्क शब्द आला कोठून …

इजिप्शियन लोक भंवऱ्यांच्या कलाकृती टाल्कने चमकवत असत

प्राचीन काळी टाल्कम पावडरऐवजी टाल्कचा वापर केला जात असे. ही पावडर टाल्क नावाच्या खनिजापासून बनवली जात असे. टाल्क निळा, हलका हिरवा, राखाडी, गुलाबी, पांढरा, पिवळा, तपकिरी किंवा चांदीच्या रंगाचा असू शकतो. तो ओलावा किंवा तेल शोषण्यासाठी वापरात यायचा.

प्राचीन इजिप्तमध्ये भंवराला शुभ मानले जात होते. भंवरे हे इतके महत्त्वाचे मानले जात होते की त्यांच्या कलाकृती आणि शिक्के बनवल्या जात होत्या. या कलाकृतींना सुंदर दाखवण्यासाठी देखील टाल्कचा वापर केला जायचा.याचा संबंध इजिप्शियन देव 'रा' शीही जोडला जातो.

इतिहासकारांचा असा विश्वास आहे की प्राचीन इजिप्तमध्ये टाल्कचा वापर कॉस्मेटिक म्हणून देखील केला जात असे. असे मानले जात होते की यामुळे देवता प्रसन्न होतात.

10,000 बीसी पर्यंत, इजिप्तमधील पुरुष आणि स्त्रिया दोघेही आपली त्वचा मऊ ठेवण्यासाठी सुगंधी पदार्थ वापरत असत. त्यात टाल्क सुद्धा असायचे.

टाल्क म्हणजे काय, याचा पहिल्यांदा शोध लागला 1880 मध्ये. जाणून घ्या कसे?

कॅनडाच्या एका शेतात टाल्कची खाण सापडली

इजिप्शियन लोक टाल्कचा वापर करत असले तरी त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. 1880 मध्ये कॅनडातील मॅडॉक येथील एका शेतात त्याची खाण सापडल्यानंतर टाल्कला त्याची ओळख आणि नाव मिळाले. टाल्कची ही पहिली खाण होती.

1896 मध्ये हेंडरसन टाल्क माइन नावाची कंपनी येथे उघडण्यात आली. येथूनच टाल्कने सौंदर्य बाजारात प्रवेश केला. जरी कॅनडामध्ये टाल्कचा शोध लागला असला तरी, भारत हा जगातील सर्वात मोठा टाल्कम पावडर उत्पादक देश आहे आणि तो येथे तो सर्वात जास्त वापरला जातो.

आता परत आपण जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरकडे वळू या…

टाल्कपासून टाल्कम पावडर कसा बनतो..यामागे पण एक कथा आहे….

खाजेमुळे परेशान झाल्याने, टाल्कम पावडर बनवला गेला

अमेरिकेचे डॉ. फ्रेडरिक बी. किल्मर हे टाल्कम पावडर बनवणारे पहिले व्यक्ती होते. ते फार्मासिस्ट आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे वैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक होते. किल्मर यांनी एका रुग्णाला खाज सुटल्यानंतर या टाल्कम पावडर निर्मिती केली.

खरे तर या रुग्णाच्या हातावर प्लास्टर बांधलेल होते. ज्यावेळी प्लास्टर कापल्या गेले त्यानंतर त्या रूग्णाला खाज सुटायला लागली. डॉक्टर किल्मर यांना त्यांनी याबद्दल सांगितल्यावर त्यांनी इटालियन परफ्यूमने सुसज्ज असे पावडर औषध म्हणून पाठवले. हे गोष्ट 1892 सालची आहे.

यानंतर त्यांनी यावर खूप विचार केला आणि 1893 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसाठी खाज सुटण्यापासून आराम मिळावा म्हणून बेबी पावडर तयार केली. त्यानंतर कंपनीने वर्षभरानंतर ही पावडर बाजारात आणली.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने टाल्कम पावडर भारतात पोहोचवली

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका वर्षानंतर 1948 मध्ये पहिल्यांदा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यांनी भारतात बेबी पावडर लाँच केली, जी लहान मुलांना पुरळ येण्यापासून वाचवते. त्यावेळी मुंबईतील ब्रिटीश ड्रग हाऊस नावाची स्थानिक कंपनी ते पावडर बनवत होती.

1957 मध्ये, जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया लिमिटेडची स्थापना आणि नोंदणी झाली. तेव्हा येथे फक्त 12 कामगार काम करायचे. 1959 मध्ये मुंबईत उत्पादनासाठी मुलुंड प्लांट सुरू करण्यात आला.

पुढे जाण्यापूर्वी, खालील ग्राफिकमधून जॉन्सन आणि जॉन्सनच्या पावडरच्या विवादाबद्दल जाणून घ्या.

प्रत्येक सौंदर्य उत्पादनामध्ये टाल्क असते

केवळ बेबी पावडरच नाही तर फूट पावडर, प्रथमोपचार पावडर, आयशॅडो, ब्लशर, मस्करा, आयलाइनर आणि लिक्विड आणि ड्राय फाउंडेशनसह अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये टाल्कचा वापर केला जात आहे. यापासून डियोड्रेंट्स देखील बनवते. अनेक नामांकित कंपन्यांनी त्याचा वापर केला आहे. महिलांसाठी बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक स्वच्छता उत्पादनांमध्येही ते टाकले जात आहे.

टाल्कम पावडरचा वापर त्वचा मऊ करण्यासाठी आणि घामाचा वास दूर करण्यासाठी केला जातो. मात्र, याचा वापर केल्यामुळे आपले शरीर हे रोगाचे माहेरघर बनतो. टाल्कम पावडरमुळे अनेकांना कॅन्सर झाला. विशेषतः महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका कर्करोगग्रस्त डार्लीन कोकरचा उल्लेख तुम्ही वर वाचलाच आहे.

खालील ग्राफिक कोणत्या सौंदर्य उत्पादनांमध्ये टाल्कम आहे हे दर्शविते.

अमेरिकेत टेस्ट केल्यानंतर जवळपास 4 हजार महिलांना कर्करोग झाल्याचे निष्पण

टाल्कम पावडरविरुद्धचा लढा हा अमेरिकेपासून सुरू झाला. अमेरिकेत दहा लाखांहून अधिक महिला अजूनही टाल्कम पावडर वापरतात. मात्र दररोज वापरणाऱ्यांपैकी चार हजारांहून अधिक महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळून आला. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केलेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे.

'आफ्रिकन अमेरिकन कॅन्सर एपिडेमियोलॉजी स्टडी' आणि 'न्यू इंग्लंड स्टडी' यांनी आफ्रिकन-अमेरिकन महिलांवर संशोधन केले. यामध्ये 63% महिला गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. या त्या महिला होत्या ज्या रोज टाल्कम पावडर वापरत होत्या. एका संशोधनात उंदरांच्या ओव्हेरियन टिश्यूवर टाल्कम पावडरचे भयंकर सत्य दिसले. हे संशोधन 1971 मध्ये 'द लॅन्सेट' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते.

1992 च्या प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्राच्या (Obstetrics & Gynecology) अभ्यासात असे आढळून आले की ज्या स्त्रिया 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सभोवती दररोज टॅल्कम पावडर लावतात त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. 2013 मध्ये, कॅन्सर प्रिव्हेंशन रिसर्चने नोंदवले की टाल्कम पावडरचा वापर महिलांमध्ये कर्करोगाचा धोका 30% वाढवतो.

तुमच्या माहितीस्तव आम्ही तुम्हाला येथे सांगतो की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने 2 वर्षांपूर्वीच अमेरिका आणि कॅनडातील बाजारातून त्यांचे टाल्कम उत्पादन काढून टाकले आहे.

टाल्कम पावडरला कॅन्सरचे एजंट का म्हटले जाते?

ज्या खाणीतून टाल्क काढला जातो त्या खाणीतही 'अ‍ॅस्बेस्टॉस'.आढळतो.'अ‍ॅस्बेस्टॉस'.हे सिलिकेट खनिजाचा एक प्रकार आहे. भारतात याचा वापर सिमेंटचे पत्रे तयार करण्यासाठी केला जातो. 'अ‍ॅस्बेस्टॉस'.वर यापूर्वीही बरेच वाद झाले आहेत.

भारतात पांढर्‍या 'अ‍ॅस्बेस्टॉस'.च्या खाणकामावर बंदी आहे. तथापि, त्याची आयात, निर्यात आणि बांधकाम उद्योगात वापरावर बंदी नाही.

अ‍ॅस्बेस्टॉस' हा रक्तात मिसळतो

महिला अनेकदा मासिक पाळीच्या वेळी पुरळ उठते तेव्हा त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सभोवती टाल्कम पावडर लावतात. हे टाळले पाहिजे.डॉ. रितू सेठी, क्लाउडनाईन हॉस्पिटल, गुरुग्राम येथील स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी सांगीतले की

टाल्कम पावडरमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. त्यात अ‍ॅस्बेस्टॉस' देखील आहे. जेव्हा पावडर लावली जाते तेव्हा त्वचा मिश्रित अ‍ॅस्बेस्टॉस'चे तंतू शोषून घेते. ते त्वचेद्वारे शिरांमध्ये प्रवेश करते. हे तंतू अंडाशयाच्या ऊतींकडे आकर्षित होतात आणि तिथे जमा होतात.

यामुळे अंडाशयात लहान लहान सिस्ट म्हणजे गाठी तयार होतात ज्यामुळे गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबला नुकसान होते. यामुळेच गर्भाशयाचा कर्करोग होतो. याला गर्भाशयाचा कर्करोग असेही म्हणतात.

त्याची लक्षणे लवकर दिसत नाहीत. हे इतके धोकादायक आहे की कर्करोगाच्या 3 आणि 4 स्टेजवर पोहोचल्यानंतरच हा रोग ओळखला जातो. यानंतर केमोथेरपीशिवाय उपचाराचा पर्याय नाही.

10 वर्षांहून अधिक काळ टाल्कम पावडर वापरल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचाही धोका

फरिदाबादच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. रवी शेखर झा, सांगतात की, जर एखाद्याला आधीच एलर्जी असेल, तर टाल्कम पावडरचे कण आणि त्याचा सुगंध त्यांना दम्याचा रुग्ण बनवू शकतो.

ज्यांना ऍलर्जी नाही आणि नियमितपणे टाल्कम पावडर वापरत आहेत त्यांच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि दमा होऊ शकतो.

10 वर्षांहून अधिक काळ टाल्कम पावडर वापरल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच मेसोथेलियोमा हा एक धोकादायक प्रकार आहे. हा कर्करोग फुफ्फुसाच्या अस्तराच्या बाहेर होतो जो असाध्य आहे.

लहान मुलांना टाल्कम पावडरची गरज नाही

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने मुलांना टाल्कम पावडर न वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, अनेक बालरोगतज्ञ देखील हे करण्यास नकार देतात. त्यांचा असा युक्तिवाद आहे की जर टाल्कम पावडर इनहेलेशनद्वारे मुलाच्या शरीरात प्रवेश करत असेल तर त्यामुळे संसर्ग, गुदमरणे किंवा श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांनी डायपर घालण्यापूर्वीच टाल्कम पावडर लावणे टाळावे.

यावर सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्लीचे बालरोगतज्ञ डॉ. नीरज गुप्ता सांगतात की, लहान मुलांना खरं तर टाल्कम पावडर लावण्याची गरजच नाही.

पुरळांवर टॅल्कम पावडरऐवजी खोबरेल तेल लावा

टाल्कम पावडर लावणे नेहमी टाळा. दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील त्वचाविज्ञानी डॉ. रश्मी शर्मा म्हणाल्या, "महिलांना पुरळ आल्यावर अनेकदा अंडरआर्म्स आणि प्रायव्हेट पार्टजवळ पावडर लावतात, पण त्यांना ते न लावण्याचा सल्ला दिला जातो. मी नेहमी अशावेळी खोबरेल तेल लावण्याची शिफारस करते.

टाल्कम पावडरमुळेही त्वचेचा कर्करोग होऊ शकतो का यावर काही संशोधन झाले आहे. USAच्या हवाई विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जर अ‍ॅस्बेस्टॉसयुक्त टाल्कच्या संपर्कात अनेक वर्षे दररोज राहिल्यास त्वचेची जळजळ, खाज सुटणे, पुरळ आणि वेदना होऊ शकतात. ते त्वचेद्वारे सहजपणे शरीरात प्रवेश करते. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने देखील याची पुष्टी केली आहे.

महिलांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की टाल्कम पावडरसारखे कोणतेही सौंदर्य उत्पादन वापरण्यापूर्वी, त्यात समाविष्ट असलेल्या घटकांची माहिती घ्या. भविष्यात ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही ना?

बातम्या आणखी आहेत...