आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लहानग्यांच्या विचारांच्या काही सीमा नाहीत आणि त्यांच्या कल्पनांना कुठेच अंत नाही. विचार आणि कल्पनेतून उमगलेल्या कल्पकतेला विस्तार देणे लहान मुलांच्या मानसिक विकासासाठी खूप आवश्यक आहे. सोबतच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक गोष्टी पुरवणे गरजेचे आहे.
मुलांच्या छोट्या-छोट्या कल्पकतेचे कौतुक
वेळोवेळी आपल्या मुलांच्या भावनांना व्यक्त करणे, शब्दांकित करणे आणि कल्पना विश्वाला भरारी द्या. त्यांच्या छोट्या-छोट्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन द्या तसेच आणखी चांगले करण्यासाठी प्रेरित करावे. कोरोना काळात मुलांकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करणे त्यांच्या भवितव्यासाठी चांगले आहे. अशात त्यांच्या क्रिएटिव्हिटीला दिशा देणे खूप आवश्यक आहे. अन्यथा डिजिटल विश्व आणि मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यात अडकून ते भटकू शकतात.
आपल्यात लपलेले टॅलेंट बाहेर आणा आणि जिंका आकर्षक बक्षीस
याच गोष्टी लक्षात घेऊन लहानग्यांच्या विचार आणि कल्पना शक्तीला विस्तार देण्यासाठी दिव्य मराठी असे एक मंच घेऊन आले आहे, की जेथे मुले-मुली आपल्या टॅलेंटचे मोकळेपणाने प्रदर्शन करतील. या स्पर्धेचे नाव ज्युनिअर एडिटर-5 असे आहे. यामध्ये सहभागी होऊन ते आपल्या छुप्या टॅलेंटला बाहेर आणू शकतील. सोबतच, आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठावर आणून ते अनेक प्रकारची आकर्षक बक्षीसे सुद्धा जिंकू शकतील. तर त्वरा करा, ही संधी हातातून जाऊ नये.
अधिक माहितीसाठी वेबसाइट https://junioreditor.groupbhaskar.in/ ला भेट द्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.