आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंड दूर होती, मग बनवले किसिंग डिव्हाइस:हजारो किलोमीटर दूरवरून किस करू शकाल; डिव्हाइससाठी ग्राहक वेटिंगवर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनसह संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत होते. लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांच्या आप्त-स्वकियांना भेटता येत नव्हते. चीनमधील एक मुलगाही असाच त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर झाला होता. लॉकडाऊनदरम्यान त्याला अनेकदा गर्लफ्रेंडची आठवण यायची. मात्र त्याला तिला भेटता येत नव्हते.

तेव्हा त्याच्या मनात विचार आला की, एखादे असे डिव्हाइस बनवावे ज्याच्या माध्यमातून लोकांना हजारो किलोमीटर दूर राहुनही आपल्या नात्यात दुरावा जाणवणार नाही.

त्यानंतर त्याने किसिंग डिव्हाइस बनवण्यासाठी आपली पूर्ण कमाई त्यात लावली.

अलिकडे काही दिवसांपूर्वीच हे किसिंग डिव्हाइस बाजारात आले आहे. ज्याच्या माध्यमातून दूरवरील आपल्या पार्टनरला किस करता येईल. या प्रॉडक्टने बाजारात येताच जगभरात खळबळ उडवली आहे. याला इतक्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत की 30 हजारपेक्षा जास्त लोक वेटिंगवर आहेत.

चीनमधील इन्व्हेस्टर झाओ झिन्बो लॉकडाऊनमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर झाला होता. त्यानंतर त्याला हे किसिंग डिव्हाइस बनवण्याची कल्पना सुचली.
चीनमधील इन्व्हेस्टर झाओ झिन्बो लॉकडाऊनमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर झाला होता. त्यानंतर त्याला हे किसिंग डिव्हाइस बनवण्याची कल्पना सुचली.

हे डिव्हाइस सिलिकॉनच्या ओठांत खरी अनुभूती ओतते

सिलिकॉनने बनलेले हे डिव्हाइस सेन्सरच्या माध्यमातून किसिंग डेटा दोन जणांमध्ये ट्रान्सफर करते. यासाठी एक विशेष अॅप डाऊनलोड करावे लागते. ज्यानंतर हे डिव्हाइस चार्जिंग पॉइंटला लावावे लागते. नंतर किसिंग डिव्हाइसला किस करतात. ज्यातून डेटा दुसरीकडील पार्टनरच्या डिव्हाइसपर्यंत जातो आणि सिलिकॉन लिप्सच्या माध्यमातून त्यालाही किसिंगचा तसाच अनुभव मिळतो. यात सोबत व्हिडिओ कॉलिंगचाही पर्याय आहे.

हे बनवणाऱ्या चीनी संशोधक झाओ झिन्बोचे म्हणणे आहे की, त्याला लॉकडाऊनदरम्यान व्हिडिओ कॉलवर बोलताना भौतिक अनुभूतीची उणीव जाणवली. त्यानंतर त्याला असे डिव्हाइस बनवण्याची कल्पना सुचली. झाओचे म्हणणे आहे की त्याचे हे डिव्हाइस दूर बसलेल्या लोकांनाही जवळ असल्याची अनुभूती देते.

3 हजार डिव्हाइस विकले. 30 हजार ऑर्डर्स पेंडिंग

चीनमध्ये बनलेल्या या डिव्हाइसला मागणी जगभरातून मागणी मिळत आहे. याची किंमत सुमारे 3500 रुपये आहे. मेल आणि फीमेलसाठी वेगवेगळ्या प्रकारचे किसिंग डिव्हाइस दिले जाते. कंपनीने सुरुवातीच्या ट्रायलअंतर्गत 3 हजार डिव्हाइस बनवल्या होत्या, त्या सर्व विकल्या आहेत. याशिवाय कंपनीला नव्या 30 हजार ऑर्डरही मिळाल्या आहेत.

किसिंग डिव्हाइसचे ओठ सिलिकॉनचे बनलेले असतात. लिप्स मूव्हमेंटशिवाय या डिव्हाइसमधून किसिंगचा आवाजही येतो.
किसिंग डिव्हाइसचे ओठ सिलिकॉनचे बनलेले असतात. लिप्स मूव्हमेंटशिवाय या डिव्हाइसमधून किसिंगचा आवाजही येतो.

प्रेमातच बनले बेकिंग पावडर, बँडेज आणि मॅग्नेटिक बटण

चीनी संशोधकाने गर्लफ्रेंडच्या प्रेमात किसिंग डिव्हाइस बनवले आहे. शक्यता आहे की येणाऱ्या काळात हे डिव्हाइस जगभरात लोकप्रिय ठरेल. मात्र इतिहासात यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, जेव्हा प्रेमापोटी मोठमोठी संशोधने झाली.

जे बेकिंग पावडर आपल्या किचनचा अविभाज्य भाग बनले आहे, त्याचा फॉर्म्यूलाही प्रेमातूनच निपजला आहे. 1843 च्या पूर्वी खस्ता बनवण्यासाठी थेट खमीरचा वापर केला जायचा. मात्र अल्फ्रेड बर्ड नावाच्या एका ब्रिटिश केमिस्टच्या बायकोला खमीरची अॅलर्जी होती. ते टाळण्यासाठी अल्फ्रेड बर्डने बेकिंग पावडरचा फॉर्म्यूला शोधला. यानंतर खमीरऐवजी बेकिंग पावडरचा उपयोग होऊ लागला.

छोट्या-मोठ्या कटस लागल्यावर आपल्याला लगेच बँडेज आठवते आणि आपण ते जखमेवर लावतो. हे बँडेजही प्रेमापोटीच जगभरातील लोकांपर्यंत पोहोचले आहे. वर्ष 1920 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की जेवण बनवताना त्याच्या पत्नीचे बोट कापते. त्यानंतर त्याने जखमेवर लावले जाणारे पहिले बँडेज बनवले.

याशिवाय सर्जिकल ग्लोव्ह, मॅग्नेटिक शर्ट बटण, फोल्डिंग आयर्नसारख्या गोष्टीही पहिल्यांदा जोडीदाराची गरज लक्षात आल्यानंतरच बनवल्या गेल्या.

ही बातमीही वाचा...

आजच्याच दिवशी केला होता मोबाईलवरून पहिला कॉल:पहिला मोबाईल 8 लाखांचा; मोबाईलच्या उत्क्रांतीची कहाणी