आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारियल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कुशल पाल सिंह हे वयाच्या 91 व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की 5 वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर त्यांचा एकटेपणा वाढत गेला, मात्र नंतर त्यांच्या आयुष्यात लव्ह पार्टनर शीना आल्या.
पत्नी गेल्यानंतर आयुष्यात एकाकीपणा अनुभवत होते अब्जाधीश
अब्जाधीशांच्या यादीत असलेले रियल इस्टेट व्यावसायिक केपी सिंह यांच्या पत्नीचे 2018 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते.
केपी सिंह यांनी सांगितले की त्यांची पत्नी त्यांच्यासाठी मित्रापेक्षा कमी नव्हती. त्यांच्या कर्करोगाने मृत्यूनंतर त्यांनी एकट्याने जीवन जगणे स्वीकारले होते. केपी सिंह म्हणतात की तुम्ही 65 वर्षानंतर एक जीवनसाथी गमावतात तेव्हा तुम्ही औदासिन्यात जाता. तुम्ही आधीसारखे राहत नाही. एखाद्याने जगातून निघून जाण्याची खंत तुम्हाला आतून पोखरते.
पत्नीने जीवन जगणे न सोडण्याचे वचन घेतले होते
सिंह यांनी मुलाखतीत सांगितले, 'पत्नीने मला आयुष्यात हार न मानण्यास सांगितले होते. ती मला म्हटली होती की माझ्याकडे पुढे जाण्यासाठी एक जीवन आहे. तिने मला वचन मागितले होते की मी जीवन जगणे सोडणार नाही. माझ्या पत्नीने म्हटले होते की हे जीवन कधीही परत येणार नाही. हे शब्द नेहमी माझ्यासोबत राहिले.'
90 वर्षांच्या आजोबांनी स्वतःपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या गर्लफ्रेंडशी लग्न केले
गेल्या वर्षी अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली होती. यामुळे सर्वजण थक्क झाले होते. 90 वर्षांचे आजोबा मॉरिस बेंटन यांनी 92 वर्षीय आजी जोने ऑरिस यांना आधी प्रपोज केले. त्याच्या एक वर्षानंतर लग्न बंधनात अडकले.
लग्नाच्या आधी दोघे एकमेकांसोबत 37 वर्षे राहिले. सामान्यपणे या जोडप्याला Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. यापैकी आजीच्या 2 मुली आणि 6 नातवंडे आहेत. त्यांच्या नातींनाही 2 मुले आहेत.
जोने ऑरिस यांचा पहिला विवाह घटस्फोटाने संपुष्टात आला होता आणि त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी दुसरे लग्न केले. यानंतर नशीबाने त्यांची साथ दिली नाही आणि 50 वर्षांच्या वयात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. जोने ऑरिस यांचे हे तिसरे लग्न आहे.
बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी 90 वर्षीय व्यक्तीने केले लग्न
अशाच प्रकारे 2013 मध्ये मृत पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सौदी अरेबियात एका 90 वर्षीय व्यक्तीने मजबुरीने पुन्हा एका 40 वर्षीय महिलेशी विवाह केला होता.
गल्फ न्यूजनुसार, वडिलांसाठी नवरी शोधण्याचे काम त्यांच्या पाच मुलींनी केले आणि यासाठी त्यांना तीन महिने लागले. अल थकाफी सुरुवातील या लग्नासाठी नकार देत होते. मात्र मुलांचा हट्ट केला की मृत आईच्या इच्छेसाठी लग्न करा.
या दाम्पत्याला सात मुले आणि पाच मुली होत्या. आजारी पत्नीने मृत्यूपूर्वी म्हटले होते की थकाफींनी दुसरे लग्न करावे. मात्र त्यांनी असे केले नाही आणि ते तिची देखभाल करत राहिले. 90 वर्षांच्या या नवरदेवाचा सर्वात मोठा मुलगा अब्दुल्लाने म्हटले की आम्ही नव्या जोडप्याच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करतो. या लग्नात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.