आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉंग ड्राईव्हसाठी निघालात का:मग तुमच्या कारमध्ये या वस्तू जरूर ठेवा, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर करता येईल मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटनाला जाणे सर्वांना आवडते. विशेष करून तुम्ही जर तुमच्या कारने लांबच्या प्रवासासाठी किंवा पर्यटनासाठी जात असाल तर तुम्हाला कारमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्या कारमध्ये त्या वस्तू असल्या तर तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जाणे सहज शक्य होईल.

चला तर कारमध्ये या 10 वस्तू कोणत्या ठेवायच्या यााबद्दल जाणून घेणार आहोत.

  • कारची कागदपत्रे

लांबच्या टूरला जायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कारची सर्व कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. या कागदपत्रांमध्ये सर्व्हिसिंगची माहिती देणारे कागदपत्र देखील सोबत ठेवावी.

  • प्रथमोपचार पेटी

कारमध्ये प्रथमोपचार पेटी असने अत्यंत आवश्यक आहे. ही पेटी आपल्याला सुरक्षित असल्याची भावना निर्माण करते. चुकून अपघात झाल्यास अशावेळी तुम्हाला प्रथमोपचार पेटीचा उपयोग होऊ शकतो.

  • टायर इन्फ्लेटर

अतिवेगात कार नेण्यासाठी टायरमध्ये योग्य हवा असणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे बऱ्याच कारमध्ये इनबिल्ट टायर प्रेशन मॉनिटर असते. टायरामधील हवा योग्य स्थितीत आहे की नाही. हे तपासण्यासाठी तुम्हाला टायर इन्फ्लेटरची गरज पडते. आपात्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही टायर इन्फ्लेक्टर सोबत असल्यास फायदेशीर ठरेल.

  • अतिरिक्त टायर हवे

जर तुम्ही लांबच्या टूरवर जात असाल तर अशावेळी तुमच्याकडे एक अतिरिक्त टायर असणे गरजेचे आहे. टायर पंक्चर झाल्यास हे अधिकचे टायर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही स्वतः टायरचे पंक्चर काढण्याबाबत जाणकार असाल तर तुम्ही त्यासाठी लागणारे रिपेअर जेल देखील वापरू शकता.

  • बेसिक टूल किट ठेवावे

एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कारमध्ये ठेवणे आवश्यक आहे. प्रामुख्याने तुमच्या वाहनात बेसिक टूल किट असणे अत्यंत आवश्यक आहे. ड्राइव्हिंग करताना तुम्ही कोणतीही छोटी मोठी समस्या आली तर या कीटचा उपयोग होवू शकतो.

  • पानी आणि खाद्यपदार्थ

लांबच्या टूरसाठी तुम्ही कारमध्ये निघत असाल तर तुमच्याकडे शुद्धपेय जल असावे. वातावरणात होणारा अचानक बदल आणि वाहतुकीचा खोळंबा झाल्यास तुम्हाला कारमधील पानी आणि खाद्यपदार्थ अधिक उपयुक्त ठरू शकते. विशेष करून कारच्या रेडिएटरला ठंड करण्यासाठी देखील पाण्याची गरज पडते.

  • प्लॅशलाईट

जर समशान जंगलातून कारने जात असाल तेव्हा तुम्हाला रस्त्याचा अंदाज घेण्यासाठी सर्वात उपयुक्त वस्तू कामी पडते. तसेच हेडलाईटमध्ये काही अडचण आल्यास प्लॅशलाईट अतिशय उपयुक्त ठरू शकते.

  • अग्निशमन यंत्र

बहुतांश कारमध्ये अग्निशमन यंत्र नसते. मुळात महामार्गावर कार चालवताना तुमच्याकडे अग्निशमन यंत्र कारमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. दुदैवाने अपघात झाल्यास अशावेळी अग्निशमन यंत्र अधिक उपयुक्त ठरते.

  • जंबर केबल

लांबच्या प्रवासासाठी जात असताना तुमच्या कारची बॅटरी अचानक संपली. तेव्हा तुम्ही पूर्णपणे अडचणीत येवू शकता. अशावेळी कोणत्याही कटकटीविना तुम्ही तुमची कार सुरू करण्यासाठी जम्प स्टार्ट करण्यासाठी जम्पर केबल जरूर रखे. हे अतिशय उपयुक्त ठरते. जंपर केबल हे बॅटरी बूस्टर म्हणून देखील काम करतात. कोणीही याला आपल्या कारसाठी उपयोगी आणू शकते. हे केबल आता युएसबी कनेक्शनसह मिळू लागले आहे. ज्यामुळे सर्व डिवाईस चार्ज होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...