आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. मात्र या लग्नगाठीचे नाते या पृथ्वीवरच निभवावे लागते. नात्यात कसे वातावरण असावे जेणेकरून नाते चांगले टिकेल आणि गूड मॅरेज म्हटले जाईल.
डिक्शनरीबद्दल बोलायचे झाल्यास, लग्न, विवाह आणि मॅरेज या शब्दाचा सरळ अर्थ संस्कार, आनंद, समाधानाशी जोडलेला आहे. पण वास्तवात लग्न या शब्दांत बांधले जाऊ शकते का? जर तुम्ही यावर विचार केला तर समजून घ्या तुम्ही गूड मॅरेजची पायाभरणी केली आहे.
गूड मॅरेजवर बोलण्यापूर्वी आधी एक-दोन उदाहरणे पाहून घेऊया...
गूड मॅरेजचे उदाहरण बनले ग्लाडू दाम्पत्य, विश्वविक्रम रचला
1919 मध्ये जन्मलेले अमेरिकेतील युजेन ग्लाडू आणि 1922 मध्ये जन्मलेल्या डोलोरेस ग्लाडू असेच जिंदादिल दाम्पत्य आहे. ज्यांच्या नावे दीर्घ आणि आनंदी वैवाहिक आयुष्य घालवल्याचा विश्वविक्रम आहे.
दोघांचे लग्न 25 मे 1940 रोजी रोहडे आयलंडच्या वूनसोकेटमध्ये झाले होते. जुलै 2021 मध्ये त्यांच्या या अनोख्या विक्रमाची गिनीज बूकने नोंद घेतली. तेव्हा दोघांच्या लग्नाला 81 वर्षे आणि 57 दिवस झाले होते.
दाम्पत्याच्या कुटुंबात आहे 5 पिढ्या
ग्लाडू दाम्पत्याचे कुटुंब आता पाच पिढ्यांचे झाले आहे. आजही ते एकत्र नृत्य-गायन, हिंडणे-फिरणे यात मागे नाही. ते आनंदाचा एकही क्षण कुटुंबासोबत घालवण्याची संधी सोडत नाही. दोघांत एकमेकांसोबत राहण्याची इच्छा अजूनही तशीच आहे, जशी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत होती.
इन्फोसिसच्या नारायण मूर्तींच्या यशामागे आहे गूड मॅरेज
देशातील नामांकित आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसला या टप्प्यावर नेऊन पोहोचवण्यात नारायण मूर्तींची महत्वाची भूमिका राहिली आहे. मात्र नारायण मूर्तींनी अनेक मुलाखतींत सांगितले आहे की, ही कंपनी त्यांनी त्यांच्या काही अभियंता मित्रांच्या सोबतीने सुरू केली होती. यासाठी त्यांनी पत्नी सुधा मूर्तींकडून 10 हजार रुपये घेतले होते. म्हणजेच नारायण आणि सुधा मूर्तींच्या गूड मॅरेजमुळेच एवढ्या मोठ्या कंपनीची सुरुवात होऊ शकली. सुधा आणि नारायण मूर्तींची लव्ह स्टोरी पुण्यातील टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीतून सुरू झाली होती.
दोघेही हेच काम करायचे. यादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. नारायण मूर्ती सुधांसोबत डेटवर जायचे तेव्हा सुधा बिल द्यायच्या. कारण नारायण मूर्तींकडे तेव्हा जास्त पैसे नसायचे. 10 फेब्रुवारी 1978 रोजी बंगळुरूत नारायण मूर्ती आणि सुधांचा विवाह झाला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 1981 मध्ये इन्फोसिसची पायाभरणी करण्यात आली. आज त्यांचेच जावई ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. इथे हेही सांगायला हवे की 2006 मध्ये सुधा मूर्तींना पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे. त्या सथ्या शिक्षिका, लेखिका याशिवाय इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत.
गूड मॅरेजच्या दोन कथा जाणून घेतल्यानंतर हे जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी आहेत, ज्या एक लग्न सुंदर बनवतात. अमेरिकेच्या रॉचेस्टर विद्यापीठ आणि तज्ज्ञांच्या 12 पॉईंटमधून हे समजून घेऊया-
गूड मॅरेजची संकल्पना या व्यक्तीमत्वांच्या गोष्टींतून समजून घेण्याचा पर्यत्न करूया
अमेरिकन लेखक विल्यम लायन फेल्प्स सांगतात की पृथ्वीवर सर्वात आनंदाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे लग्न. अमेरिकेतील कम्पोझर फ्रेंच सुबर्टही याला दुजोरा देतात आणि म्हणतात की जगात तेच आनंदी आहेत, ज्यांनी खरा मित्र शोधला आहे आणि सर्वात आनंदी तेच आहेत ज्यांचा खरा मित्र त्यांचा जोडीदार किंवा बायको आहे. आणखी एक अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांचे म्हणणे आहे की जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायचा असेल तर सर्वात आधी आपल्याकडे हा आनंद वाटून घेण्यासाठी कुणीतरी आपले असायला हवे.
गूड मॅरेजमध्ये काही अशा गोष्टी अडथळा आणण्याचे काम करतात, ज्यांच्यावर वेळीच लक्ष दिले तर नाते बिघडण्यापासून वाचवले जाऊ शकते, या ग्राफिक्समधून समजून घ्या -
हिंदू धर्मातही विवाहाच्या 7 वचनांतून गूड मॅरेजची संकल्पना सांगण्यात आली आहे.
गृभ्णामि ते सुप्रजास्त्वाय हस्तं मया पत्या जरदष्टिर्यथासः।
भगो अर्यमा सविता पुरन्धिर्मह्यांत्वादुःगार्हपत्याय देवाः ॥
म्हणजेच मी तुमचा हात धरून ठेवीन. जेणेकरून आपण योग्य संततीचे आई-वडील होऊ शकू आणि आपण कधीही वेगळे होणार नाही. मी इंद्र, वरूण आणि सवितृ देवतांकडून चांगल्या गृहस्थ जीवनाचा आशीर्वाद मागतो.
धैरहं पृथिवीत्वम्। रेतोऽहं रेतोभृत्त्वम्। मनोऽहमस्मि वाक्त्वम्।
सामाहमस्मि ऋकृत्वम्। सा मां अनुव्रता भव।।
म्हणजेच, मी आकाश आहे आणि तू पृथ्वी आहेस. मी ऊर्जा देतो आणि तू ऊर्जा घे. मी मन आहे आणि तू शब्द आहेस. मी संगीत आहे आणि तू गीत आहेस. तू आणि मी एकमेकांचे पालन आणि सन्मान करू.
आधी मॅचमेकिंग आणि लग्नाला एकमेकांचा पर्याय मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांत नव्या विचारसरणीच्या मुला-मुलींची संख्या वाढली आहे. ज्यांना जोडीदार तर हवा आहे पण लग्नाविषयी काहीही देणेघेणे नाही.
जोडप्यांनी स्वीकारले, लग्नापेक्षा निरोगी नाते महत्वाचे
रिलेशनशिप कौन्सेलर डॉ. के आर धर सांगतात की हल्ली भावनिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लिव्ह-इन रिलेशन, लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. मात्र मानसिकरित्या एकमेकांबद्दल समर्पणाची स्थिती या नात्यांत कमीच दिसते. यामुळे हे नाते दीर्घ काळासाठी टिकत नाही.
या मुद्द्याविषयी डेटिंग अॅप 'अँड वी मेट' ने दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरूसारख्या शहरांत 25-35 वर्षे वयोगटातील तरूण जोडप्यांवर सर्व्हे केला.
यापैकी बहुतांश जोडप्यांनी लग्न केवळ एक शिक्का असल्याचे म्हटले आणि म्हटले की ते कमिटमेंटला जास्त महत्व देतात आणि निरोगी नाते त्यांच्यासाठी लग्नाच्या शिक्क्यापेक्षा महत्वाचे आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांत नाते बदलण्याची भीती जास्त दिसली. या भीतीचे कारण आहे समाजाच्या अपेक्षा, ज्यांचे ओझे त्यांच्यावर लग्नानंतर वाढते.
याशिवाय युनिसेफकडून केलेल्या एका सर्व्हेवरही नजर टाका -
आता बॉलीवूड स्टार्सच्या गूड मॅरेजवर बोलायचे झाल्यास सर्वात आधी अमिताभ आणि जया यांचेच नाव समोर येते
याच वर्षी जूनमध्ये अमिताभ--या बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे होतील
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला याच वर्षी 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. बॉलीवूडची ही जोडी 3 जून रोजी लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकल्यानंतर सिनेमा जगतात दोघांचे नशीब आणखी उंचावर पोहोचले. अमिताभ बच्चन यांना शतकातील महानायकाचा किताब मिळाला. आज त्यांचे मुलगा-मुलगी, सून-जावई आणि नातवंडांचे कुटुंब आहे. हे सर्व दोघांच्या गूड मॅरेजचाच परिणाम आहे.
प्रिती झिंटाने अमेरिकन पतीसोबत खास प्रकारे मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी केली
लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने 1 मार्च रोजी आपल्या लग्नाचा 7 वा वाढदिवस अनोख्या अंदाजात साजरा केला. तिने याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केल्यावर चाहत्यांनी याचे खूप कौतुक केले.
प्रिती झिंटाने 29 फेब्रुवारी 2016 मध्ये अमेरिकन व्यावसायिक जीन गूडईनफसोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न लीप इयरला झाले होते. त्यामुळे ते 1 मार्च रोजीच लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. जीन गूडईनफ अभिनेत्री प्रिती झिंटापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. याआधी प्रिती झिंटा आणि जीन गूडईनफ 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते.
यादरम्यान प्रिती झिंटाने लिहिले - दोघांच्या नात्याला 7 वर्षे उलटली हे कळलेही नाही. आम्हाला अजून अनेक अॅनिव्हर्सरी सोबत साजऱ्या करायच्या आहेत.
31 वर्षांपासून सोबत आहे हे जोडपे, दोघे मिळून स्वतःची कंपनी चालवतात
गोल्डमाईन प्रोजेक्ट कन्सल्टन्ट कंपनी मनीषा सेठ आणि केतन सेठ एकत्रितरित्या चालवतात. दोघांच्या वैवाहिक आयुष्यास 31 वर्षे झाली आहेत.
वूमन भास्करशी बोलताना जोडप्याने सांगितले की आम्हा दोघांत प्रेम, भांडण सर्वकाही होते. मात्र हे कधीही इतके जास्त वाढले नाही की आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करू. शेवटी आम्ही एकमेकांसोबत उभे राहतो. आमच्या आयुष्यात मुले आल्यापासून तर आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत.
लग्नाची फोटो फ्रेम खूप काही सांगते
डॉ. धर यांच्यानुसार, लग्नानंतर नवदाम्पत्य आपल्या स्वप्नांसोबतच घराची भिंत किंवा शोकेसमध्ये लग्नाचा फोटो फ्रेम करून ठेवायला विसरत नाही. सर्वकाही प्रेमाने चालते तोपर्यंत तो फोटोही सतत स्वच्छ केला जातो. जसजसे जोडप्यांतील अंतर वाढते, तसतशी फोटो फ्रेमवर धूळ साचायला लागते. अनेकदा तर असेही होते की जेव्हा जोडप्यांत भांडण होते, तेव्हा लग्नाच्या फोटो फ्रेमवर राग काढला जातो. एक तर फोटो जाळला जातो किंवा फोडला जातो.
मात्र गूड मॅरेज कपलसाठी लग्नाचा फोटो फ्रेम नेहमी जिंदादिल असल्याची जाणीव करून देतो. अशा कुटुंबांत फोटोफ्रेमचा लूकही चांगला होत जातो आणि चमकही सतत वाढत जाते.
प्रेम, विश्वास आणि गांभीर्याने बनते गूड मॅरेज
कपल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सारथी कौन्सेलिंग सर्व्हिसेसच्या संचालक शिवानी मिस्त्री साधोंनी सांगितले की, जोडप्यात प्रेम, विश्वास आणि दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर गांभीर्याने काम करण्याची इच्छा अशा पायाभूत गोष्टी आहे, ज्या त्यांना लग्न चांगले बनवण्यात मदत करते. सामान्यपणे हे सोपे वाटते, पण तसे वागणे तुमचा समजुतदारपणा आणि संयमावर अवलंबून असते.
तज्ज्ञ शिवानी मिस्त्री साधो आणि रिलेशनशिप कौन्सेलर डॉ. के आर धर यांच्यानुसार लग्न जपण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे
वास्तववादी दृष्टीने गोष्टी हाताळाव्याः संयमासह गोष्टी वास्तववादी दृष्टीने हाताळल्याने जीवनात आनंद निर्माण होईल आणि जीवन सोपेही होईल.
जोडीदार जसा आहे तसे स्वीकारणेः सर्वात पहिली गोष्ट जोडीदार जसा आहे तसे त्याला स्वीकारणे. एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
लैंगिक अंतर वाढवू नयेः चांगल्या नात्यासाठी शारीरिक ओढ आवश्यक आहे. शारीरिक आणि भावनिक बंध कायम ठेवावे.
विश्वास आणि मूल्यांतील अंतराची समजः प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि श्रद्धा वेगवेगळ्या असतात यात दुमत नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे.
आर्थिक, कौटुंबिक आणि करिअरमध्ये ताळमेळः जोडप्यांत आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक गोष्टींविषयी तणाव वाढल्यास कौन्सेलरची मदत घ्यावी.
आज नाती भयंकर स्थितीतून जात असताना अनेकांना लग्न या शब्दाची भीती वाटायला लागली आहे. कदाचित म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी असे म्हटले गेले आहे की शादी का लड्डू, खाये तो पछताए, ना खाये तो पछताए. मात्र जर जोडप्याने संयम आणि समजुतदारीने काम केले तर नाजूक बंधात असूनही नाते मजबूत राहते.
ग्राफिक्सः सत्यम परिडा
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.