आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनावर आधारित सकारात्मकता:सभोवतालच्या वातावरणाचा वनस्पतींवर होतो परिणाम, त्यांनाही असते भावभावनांची समज

डॉ. रितू पांडेय शर्मा | लेखिका आणि माइंडफुलनेस तज्ज्ञएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

40 वर्षांपूर्वी एक बाई आपल्या घरातील लहानशा बागेची अतिशय प्रेमाने काळजी घ्यायची, रोपट्यांशी बोलायची. पण तिचा मृत्यू होताच झाडे सुकायला लागली. वास्तविक झाडे आणि वनस्पतींवरही आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो.

भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी त्यांच्या ‘क्रेस्कोग्राफ’ या उपकरणाद्वारे शोधून काढले होते की, आजूबाजूचे वातावरण ऐकून झाडे आणि वनस्पतीही प्रतिक्रिया देतात. तिकडे अमेरिकेत एक प्रयोग करण्यात आला, त्यात सारख्याच दोन झाडांना १० दिवस एकाच वातावरणात ठेवण्यात आले.

एका रोपाशी सतत प्रेमाने बोलले जायचे, तर दुसऱ्या रोपाशी रागाने. ज्या वनस्पतीशी प्रेमाने संवाद साधला गेला त्याची वाढ सकारात्मक झाली, तर दुसऱ्या झाडाची पाने सुकली. असा एक अनोखा प्रयोग भारतातही करण्यात आला आहे, त्यात काही घरांना खुणा करून तुळशीची रोपे देण्यात आली आणि महिनाभरानंतर असे आढळले की, ज्या घरांमध्ये प्रेम आणि शांतता होती त्या घरांच्या तुलनेत ज्या घरांमध्ये जास्त भांडणे होती त्या तिथे तुळशी सुकल्या.

आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्यात शास्त्रार्थ होत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या फुलांच्या माळा कोमेजण्यावर विजय-पराजय ठरवला गेला. वास्तविक, जसे शब्द तुमच्या हृदयातून बाहेर पडतात, तसाच प्रभाव ते आजूबाजूच्या वातावरणात टाकतात.