आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहान वैज्ञानिक चार्ल्स डार्विन लग्नाचा निर्णय घेण्यावरून द्विधा मन:स्थितीत होते. ही १९३० ची गोष्ट, तेव्हा ते तिशीत होते. लग्न करायचे की नाही हा निर्णय ते घेणार होते. लग्नाचे फायदे-तोटे काय या मुद्द्यावर त्यांनी खूप विचार केला, यादी तयार केली. त्यात लग्नाचे तोटेच जास्त दिसले. पण अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डार्विन यांनी तार्किक आकलनाच्या विरोधात जाऊन निर्णय का घेतला? स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे रिसर्च फेलो रूस रॉबर्ट्स आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांवर पोहोचण्यासाठी डार्विनचे हे उदाहरण देतात. त्यांच्या मते, आपल्याला ज्या मार्गाने जायची इच्छा आहे त्याचा अचूक मार्ग निश्चित करण्याच्या प्रयत्नात जास्त वेळ खर्च करण्याऐवजी आपल्याला कुठे जायचे आहे यावर विचार करण्यात वेळ खर्च करावा. कारकीर्दीत बदल आणि नवीन जबाबदाऱ्यांसह असे काही मुद्दे उद्भवतात ज्यावर आपण दुविधेत असतो. त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी खूपच कमी आदर्श उदाहरणे असतात आणि जी असतात ती आपल्याला भटकवू शकतात. रॉबर्ट्स यांच्या मते, आयुष्यात मोठ्या निर्णयांत फायदा-तोट्याचा सिद्धांत नेहमीच उपयुक्त ठरत नाही. अर्थशास्त्राच्या सिद्धांतामुळे दिशाभूल होऊ शकते. डार्विन यांच्या फायदा-तोट्याच्या यादीत फायद्यापेक्षा जास्त नुकसानच होते. तरीही त्यांनी वेगळा निर्णय घेतला.
{लग्नाचा निर्णय का घेतला? रॉबर्ट्स यांच्या म्हणण्यानुसार, गुणाकार-भागाकार बाजूला ठेवून लग्न करण्याचा डार्विन यांचा निर्णय असे दर्शवतो की, आपण कसे जगायचे आणि आपल्याला काय व्हायचे आहे हे त्यांनी स्वीकारले. रोज मिळणारा आनंद त्यांना जास्त महत्त्वाचा वाटला. आपल्या निर्णयांमुळे मिळणारा आनंद आणि त्रास यापेक्षा आपले आयुष्य अनमोल आहे हे त्यांना जाणवले.
डार्विनला फायद्यापेक्षा तोटे जास्त जाणवले, तरीही लग्नाचा निर्णय {लग्नाचे फायदे : मुले, आयुष्याचा जोडीदार, कुटुंब, देखभाल करणारे. {तोटे : नातेवाइकांचे येणे-जाणे, वेळेचा अपव्यय, संशोधनासाठी कमी वेळ मिळणे. {एकटे राहण्याचे फायदे : कुठेही येण्या-जाण्याचे स्वातंत्र्य, नातेवाइकांकडे जाण्याचा दबाव नाही, मुलांचा खर्च, चिंता नाही, कुटुंबात वेळेचा अपव्यय नाही. {तोटे : वृद्धपणी देखभाल करणारे कुणी नाही, प्रियजनांशिवाय काम करण्यात काय अर्थ? {निर्णय : अरे देवा, संपूर्ण आयुष्य काम करत लंडनमधील घरात प्रत्येक दिवस कसा ढकलायचा हा विचार करणेच कठीण. अखेर निर्णय घेतला - लग्न करण्याचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.