आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञानाच्या जोरावर असाध्य आजारांवर मात करत अमरत्वाचा शोध घेणाऱ्या मानवाच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. येत्या 2030 पर्यंत अमरत्वाचा शोध लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. गूगलमधील एका माजी कर्मचाऱ्याच्या पुस्तकातील दाव्याने अमरत्वाविषयीची चर्चेला उधाण आले आहे.
रे कुर्त्झवील असे या माजी कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी आतापर्यंत केलेले अनेक दावे खरे ठरले आहे. त्यामुळे त्यांचा अमरत्वाचा दावाही खरा ठरू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रे कुर्त्झवील यांचे 86 टक्के दावे खरे ठरले आहेत.
2005 मध्ये लिहिले पुस्तक
रे कुर्त्झवील यांनी 2005 मध्ये द सिंग्युलॅरिटी इज निअर नावाचे एक पुस्तक लिहिले होते. यातील दाव्यानुसार मनुष्य 2030 पर्यंत अमर होऊ शकतो. जेनेटिक्स, नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्समुळे हे साध्य होईल असे त्यांनी यात म्हटले होते.
कुर्त्झवील यांचा दावा
2017 मध्येही कुर्त्झवील म्हणाले होते की 2029 पर्यंत मानव तंत्रज्ञानात इतकी प्रगती करेल की तो थेट अमर होऊ शकेल. नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव एज रिव्हर्सिंग नॅनोबॉटस बनवले. यामुळे शरीरातील खराब पेशी आणि उती लगेच बऱ्या करता येतील. यामुळे माणसाचे वय वाढणार नाही आणि तो अमर होईल असे कुर्त्झवील यांनी म्हटले होते.
आधीचे हे दावे ठरले खरे
रे कुर्त्झवील यांनी यापूर्वी केलेले अनेक दावेही खरे ठरले आहेत. कुर्त्झवील यांनी दावा केला होता की संगणक बुद्धीबळात मानवाला मात देईल. त्यानंतर 1997 मध्ये बुद्धीबळपटू गॅरी कास्पारोव्हला संगणकाने मात दिली होती. मानवापेक्षा लॅपटॉप वेगवान होईल तसेच 2010 पर्यंत जगातील अनेक भागात चांगल्या दर्जाचे नेटवर्क उपलब्ध होईल असा दावाही त्यांनी केला होता. त्यांचे हे दावे खरे ठरले आहेत.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.