आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांमधील मधुमेह .:मान व हातावरील डागही असू शकतात मधुमेहाची लक्षणे

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाइप-२ मधुमेहाने आता भारतीय मुलांनाही झपाट्याने जाळ्यात ओढले आहे. एका संशोधनानुसार, ५ वर्षांपर्यंतची सुमारे १०% मुले प्री-डायबेटिक असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते, परंतु ते मधुमेहाच्या श्रेणीत ठेवण्यासाठी पुरेसे नसते. अशा परिस्थितीत लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप-२ मधुमेह होण्याचा धोकाही वाढला आहे. निष्क्रिय जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची कारणे आहेत. याशिवाय मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, नंतर जन्मत: कमी वजन असलेल्या मुलांमधील लठ्ठपणा, गरोदरपणात अनियंत्रित मधुमेह यामुळेही टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. {मुलामधील टाइप-२ मधुमेह असा ओळखा ः मधुमेहाने ग्रस्त मुले आणि पौगंडावस्थेतील मुला सहसा दीर्घकाळ लक्षणे दिसत नाहीत. वाढलेल्या साखरेमुळे तहान वाढणे, वारंवार लघवी होणे, भूक वाढणे असे प्रकार होत असले तरी वजन कमी होणे, लवकर थकवा येणे, अस्पष्ट दिसणे, मानेच्या मागील बाजूस, काख आणि कमरेची त्वचा काळवंडू लागते. मानेच्या मागच्या बाजूला व बाजूला छोटे मस दिसू शकतात.

बातम्या आणखी आहेत...