आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेचा इतिहास 31 हजार वर्ष आहे जुना:पहिल्यांदाच शिकारी मुलाचा पाय कापण्यात आला; सांगाड्याचे मिळाले पुरावे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्याचे हात-पाय खराब झाले की डॉक्टर शस्त्रक्रिया करून शरीरापासून अवयव वेगळे करतात. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रुग्णाचा जीव वाचवण्याची ही पद्धत नवीन नाही. त्याची पहिली केस आजपासून 31 हजार वर्षांपूर्वी आली. त्यावेळी बोर्नियो बेटावर एका सर्जनने एका शिकारी मुलाचा पाय कापला होता. नेचर या जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

स्टोन एजमध्ये घटडेली घटना

संशोधनानुसार ही घटना पाषाण युगातील आहे. त्यावेळी ही शस्त्रक्रिया खूप खास होती. मुलावर एखाद्या प्राण्याने हल्ला केला किंवा अपघात झाला असेल, त्यानंतर त्याचा पाय जवळून कापला गेला. सिडनी विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल रिसर्च असोसिएट आणि जैव-पुरातत्वशास्त्रज्ञ मेलँड्री वोक यांनी नोंदवले की, शस्त्रक्रियेनंतर ते मूल 6-9 वर्षे जगले. त्याची जखम बरी होऊन त्वचा कोरडी झाली होती.

मुलाने लाकडाला आधार बनवले

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा पाय कापल्यानंतर मूल अनेक वर्षे लाकडाच्या साहाय्याने डोंगराळ भागात फिरत राहिले. मुलावर अगदी वेगळ्या प्रकारची शास्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि ती शास्त्रक्रिया इतकी भयावह होती की, तो सहन करत राहिला. त्याच्या ऑपरेशववरून असे दिसून येते की, त्यावेळी लोक आपल्या समुदायाची किती काळजी घेत होते. बोर्नियोच्या निर्जन गुहेत 'लियांग टेबो' या मुलाचा सांगाडा सापडला असून, की त्याला गुडघ्यापर्यंत पायच नव्हते.

याआधीही शस्त्रक्रियेचे पुरावे सापडले आहेत

याआधीही शस्त्रक्रियेसाठी हात-पाय कापल्याचे पुरावे मिळाले आहेत, मात्र हे फक्त 7 हजार वर्षे जुने आहेत. शस्त्रक्रियेत एका वृद्धाचा डावा हात कापण्यात आला. या दोन्ही संशोधनांवरून हे सिद्ध होते की शतकानुशतकेही लोकांना हात-पायांची नर्व्हस सिस्टीम, नसा आणि रक्तप्रवाह इत्यादींची माहिती होती. यासोबतच त्यावेळी आशियातील तज्ज्ञांनी शस्त्रक्रियेची ही पद्धत शोधून काढल्याचेही कळते.

बातम्या आणखी आहेत...