आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्स:मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे उपाय करा

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स अँड द सेन्सस ब्युरो’च्या एका संशोधनानुसार १८ ते ३९ वयोगटातील लोक कामाबाबत सर्वाधिक बेचैन असतात. हे लोक सर्वाधिक नैराश्यातही असतात. तुम्ही जर मिलेनियल (१९८० ते १९९५ दरम्यान जन्मलेले) किंवा झेन समुदायातून असाल तर तुम्ही मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी हे उपाय करू शकता...

1) आधी स्वत:ची काळजी घ्या काम आणि घरामध्ये संतुलन साधा. कामकाजाचे संतुलन राखा. आपल्या सीमा ठरवा आणि स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी पूर्ण वेळ काढा. यादरम्यान कुटुंबीयांसोबत वेळ घालवा, पुस्तके वाचा किंवा फिरायला जा. असे करण्यासाठी तुम्हाला कदाचित काही दिवस कामापासून सुटी घ्यावी लागली तरी त्यात काही वाईट नाही. सुटीमुळे मेंदू ताजातवाना होतो.

2) स्वत:ला डिस्कनेक्ट करा ऑलवेज ऑन कल्चरमुळे तुम्हाला अनेकदा असे वाटते की तुम्ही सातत्याने व्यावसायिक उद्दिष्टपूर्तीच्या मागे धावत आहात आणि काही प्राप्तही करूही शकत नाहीत. तुम्हाला मोबाइलवरून कामासंबंधी सातत्याने रिमाइंडर्स मिळत असतील तर अशा परिस्थितीत आरामदायक वाटणे कठीण असते. संगणक आणि मोबाइलचे नोटिफिकेशन्स काही वेळ बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.

3) पळू नका, संघर्ष करा मानसिक आरोग्याच्या समस्येला आजही कलंक म्हणून पाहिले जाते. याचा सामना करण्यासाठी तुमच्या व्यवस्थापकाजवळ प्रामाणिकपणे मन हलके करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे वर्क लोड आणि मानसिक आरोग्याच्या स्थितीची माहिती तुमच्या व्यवस्थापकाला अवश्य द्या. सहकाऱ्यांसोबतचे संबंध दृढ करा. त्यामुळे तुमच्या अडचणी प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर मांडण्यात मदत मिळेल.

4) सपोर्ट नेटवर्क तयार करा ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येईल अशा एका सहकाऱ्याचा शोध घ्या. तुमच्या भावना त्याला मोकळेपणाने सांगू शकाल. तुमचा असा एखादा सहकारी नसेल तर तुमची व्याप्ती वाढवा. एखादी समिती किंवा गटात जाऊन सामाजिक कार्यात सहभाग घ्या आणि विश्वासू मित्राचा शोध घ्या. यासाठी वेळ लागू शकतो, पण एक मजबूत सपोर्ट सिस्टिम असल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...