आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टाइल में रहने का:कोरोनानंतरची फॅशन इंडस्ट्री...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे जगासोबतच देशातील अनेक इंडस्ट्रींना मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात आपल्या रोजच्या वापराची गरज असलेल्या कपड्यांची इंडस्ट्री तरी कशी वाचेल? महामारीमुळे बदलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काय नवीन प्रयोग केले जातील, कोरोनाच्या संकटातून ती कशी तग धरेल, कोणत्या चढ-उतारांना सामोरे जावे लागेल, याबद्दल जाणून घेऊयात प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे यांच्याकडून...

वस्त्र ही आपल्या महत्त्वाच्या गरजांपैकी एक आहे. कपड्याच्या इंडस्ट्रीवरही या महामारीचे गंभीर परिणाम झाले आहेत. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये मोठा भार उचलणाऱ्या इंडस्ट्रीची समीकरणे बदलत चाललेली आहेत. बॉलीवूड सिनेसृष्टी, टीव्ही शोज, फॅशन शोज, मॅगझिन कव्हर, जाहिराती आणि सौंदर्य स्पर्धाच्या स्पर्धकांसाठी अशा अनेक कार्यक्रमांसाठी स्वप्निल शिंदे हे डिझायनर गेली अनेक वर्षे काम करत आहेत. फॅशनसमवेत वेगवेगळ्या फिल्डमध्ये इतकी वर्षे काम केलेले स्वप्निल शिंदे यांच्या मते कधीही न अनुभवलेली परस्थिती कोरोनामुळे अनुभवत असलेल्याच ते सांगतात. सध्याच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे त्यावर ते सांगतात, ‘आताच्या काळात फॅशन इंडस्ट्रीमध्ये नवीन असा काहीच सुरू नाहीये. सरकारी परवानगी नसल्यामुळे प्रोडक्शन हाऊस बंद आहेत. नवीन कामामध्ये फक्त ग्राहकाशी बोलून डिझाइन फायनल करणे, कपडे फायनल करणे यापलीकडे काम होता नाहीये. या सगळ्यांचा ऑर्डरची डिलिव्हरीसाठी आम्ही नोहेंबर, डिसेंबरची तारीख देत आहोत.” सगळं बंद असूनही कामगारांचा पगार, शॉप, बुटीक, प्रोडक्शन हाऊस यांच भाडं, लाइट बिल सगळच द्यावं लागतंय. चार महिने काहीही कमाई न करता हे सगळ करण खूप अवघड आहे असं स्वप्निल सांगतात. या सगळ्यातून बाहेर येत थोड्या स्टाफ सोबत कसं काम सुरू आहे याबद्दल ते म्हणतात, “आम्ही अनलॉकमध्ये काही टक्के कामगारासह काम सुरू केलं आहे. सिनेमा इंडस्ट्री सुरू होण्यासाठी खूप वेळ लागेल असा वाटत. पण टीव्ही आणि जाहिरात इंडस्ट्री सुरु आहे. त्याच काम आम्ही सर्व नियम पळून करत आहोत. सोबत आम्ही जाहिरातीसाठी वेगवेगळ्या मॉडेल्सची, सेलिब्रिटींची मदत घ्यायचं ठरवलं आहे. त्यांना काही कपडे पाठवून त्यांना फोटोशूट करायला लावून सोशल मीडियावर टाकायला सांगणार आहोत. यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या ग्राहकांना जवळ जाता येईल.”

फॅशन इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या परस्थितीत नंतर फार बदल घडतील. “संपूर्ण लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा सगळं सुरू होईल तेव्हा या इंडस्ट्रीमध्ये फॅशन ट्रेंडची समीकरणं बदललेली असतील. फास्ट फॅशनची संकल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजू झाली आहे, ज्यामध्ये छोट्या छोट्या सीझननुसार कपडांची स्टाइल बदलली जाते आणि छोट्या छोट्या काळातच नवीन कलेक्शन बाजारात येतात. हे कमी किमतीचे कपडे क्वालिटीपेक्षा जास्त काँटिटी कपडे बनवण्यावर भर देते. ही फास्ट फॅशनची संकल्पना बंद होईल असा मला वाटतं. यापुढे आपल्याला गरज असेल तरच कपडे विकत घेतले जातील. यामध्येही उत्तम दर्जाच्याच कपड्यांना लोक पसंती दर्शवतील,’असं स्वप्निल यांना वाटतं.

यापुढे सगळ्या पद्धतीच्या कपड्यांच्या किमतीवर काय परिणाम होईल याबद्दल स्वप्नील सांगतात, “डिझायनर कलेक्शन महागतील. यामध्ये ब्रायडल, हेवी लूक जास्त महाग होतील. मास प्रोडक्शन कमी झाल्यामुळे रेग्युलर कपड्यांच्या किमतींमध्येसुद्धा वाढ होऊ शकते.” फॅशन म्हटलं की मोठमोठे फॅशन शो, प्रदर्शने आलीच. हे २०२१ मध्येच चालू होईल असे स्वप्निल सांगतात. पुढेही हे सगळे शोज सुरू झाल्यावर आंतरराष्ट्रीय बायर किती टक्के येईल अशी शंका ते व्यक्त करतात.

फॅशनसारख्या ग्लॅमरस इंडस्ट्रीकडे मोठ करिअर म्हणून तरुण पिढी याचा विचार करतेय. त्यामुळे साहजिकच ज्यांच्यात खरंच खूप टॅलेंट आहे अशांनाच या इंडस्ट्रीमध्ये उभं राहता येईल. परस्थिती हळूहळू नक्कीच बदलेल. ज्यांचे आधिपासून या इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय आहेत अशा अनेकांना आजच्या काळात उभं राहणं थोडा त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःचा व्यवसाय, स्वत:चा ब्रँड किंवा लेबल सुरू करायचं आहे त्यांनी इतक्यात घाई करू नये असं मला वाटतं. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत योग्य वाटलं तरच व्यवसायला सुरुवात करावी.”

एकंदरीत फॅशन इंडस्ट्रीमध्ये फॅशन स्टाइलपासून ते किंमत, प्रोडक्शनचा रेट अशा अनेक गोष्टींमध्ये बदल येणार आहेत असे म्हणता येईल.

तेजश्री गायकवाड

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser