आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैली:न्यूयॉर्कमध्ये स्टीलचे गेट हे आशियाईंचे वैशिष्ट्य

अण्णा कंबनपती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेनलेस स्टीलचे कुंपण आणि दरवाजे हे न्यूयॉर्क शहरातील फ्लशिंग, क्वीन्स, सनसेट पार्क आणि ब्रुकलिन स्ट्रीट्समधील जवळजवळ प्रत्येक घराचे वैशिष्ट्य आहेत. चांदीसारख्या चमकणाऱ्या काही दारांमध्ये कलाकृतींची सोनेरी आभा दिसते. आपल्या घराचे स्टीलचे कुंपण, दरवाजे व हँडल दाखवून दिलीप बॅनर्जी म्हणतात की, अतिरिक्त पैसे असल्यास नेहमीच चांगले पर्याय उपलब्ध असतात.

दीर्घ काळापासून पांढरे कुंपण अमेरिकन स्वप्नाचे प्रतीक होते. स्टेनलेस स्टीलचे कुंपणही अशीच भावना निर्माण करते. मात्र, स्टीलच्या कुंपणात समानता नाही. ते घरातील रहिवाशाच्या निवडीवर अवलंबून असते. अनेक कुंपणांवर कमळाची फुले, दागिने, ओम आणि विविध आकृत्या आहेत. कॉर्नेल विद्यापीठातील शहरी पर्यावरण आणि नियोजनाचे इतिहासकार थॉमस कॅम्पानेला म्हणतात की, आशियाई मध्यमवर्गाच्या चाहुलीची ही चिन्हे नक्कीच आहेत. स्टेनलेस स्टीलशी प्रतिष्ठेचा एक घटक जोडलेला आहे.

स्टेनलेस स्टीलचे कुंपण घरांसह आजूबाजूचे रेस्टॉरंट्स, चर्च, डॉक्टरांचे दवाखाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये दिसते. न्यूयॉर्कमध्ये आशियाई अमेरिकन लोकांच्या वाढत्या संख्येचे हे द्योतक आहे. सिटी इमिग्रेशन ऑफिसच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात आशियाई आणि पॅसिफिक बेटांचे मूळ रहिवासी यांच्या संख्येत शहरामध्ये सर्वात वेगाने वाढ झाली आहे. २०१० मध्ये न्यूयॉर्कमध्ये ७,५०,००० आशियाई, पॅसिफिक स्थलांतरित होते. २०१९ मध्ये त्यांची संख्या आठ लाख ४५ हजार झाली. येथे चीन, भारत, दक्षिण कोरियासह इतर आशियाई देशांतील लोक मोठ्या संख्येने आहेत.

ब्रिटनमध्ये शोध
स्टेनलेस स्टीलचा शोध सर्वप्रथम ब्रिटनमध्ये १९१३ मध्ये लागला. वर्ल्ड स्टेनलेस स्टील असोसिएशनचे सेक्रेटरी टिम कॉलिन्स यांच्या मते, १९८० आणि १९९० च्या दशकात चीनमध्ये स्टेनलेस स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. स्टील दीर्घ काळ टिकते. लोखंडापेक्षा अधिक सहजतेने त्यात विविध आकार तयार करता येतात.

७७ वर्षीय दिलीप बॅनर्जी १९७० च्या दशकात कोलकात्याहून न्यूयॉर्कला आले होते.

बातम्या आणखी आहेत...