आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे म्हणतात. अशा प्रकारे प्रेमात घेतल्या जाणाऱ्या सुडाच्या कहाण्याही सामान्य आहेत. मात्र बिहारच्या खगरियातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. इथे प्रेमात युद्धही वेगळ्याच पद्धतीचे झाले आणि सूडही वेगळ्याच अंदाजात घेतला गेला.
या प्रकरणात दोन महिलांनी एकमेकींच्या पतीशी लग्न केले. इतकेच नव्हे दोघींनी एकमेकींच्या मुलांनाही स्वीकारेल आहे. रंजक म्हणजे दोघींनी हे सत्य स्वीकारताना एकमेकींविषयी कोणताही द्वेषही कायम ठेवला नाही.
तीन मुलांना घेऊन माहेरच्या प्रियकरासोबत निघून गेली
खगरियात राहणाऱ्या रुबी देवीचे लग्न 2009 मध्ये नीरज कुमार यांच्याशी झाले होते. रुबी या लग्नासाठी राजी नव्हती. तिचे माहेरातील एका मुलावर प्रेम होते. मात्र घरच्यांनी दबाव टाकून तिचे लग्न नीरजशी लावून दिले. मात्र रुबी मनातून प्रियकराची आठवण करायची.
याचदरम्यान रुबी आणि नीरजला 4 मुलेही झाली. मात्र रुबीच्या मनात माहेरच्या प्रियकराविषयी भावना कायम होत्या.
अखेर गेल्या वर्षी फेब्रुवारीत रुबी तीन मुलांना घेऊन प्रियकरासह निघून गेली. तिने एका मुलीला नीरजजवळ सोडले.
एकटेपणात नीरज आणि मुकेशची पत्नी जवळ आले, लग्न केले
रुबी आणि मुकेशच्या लग्नाने दोन्ही कुटुंब उध्वस्त झाले. मुकेश विवाहित होता. त्यालाही मुले होती. योगायोगाने त्याच्या पत्नीचे नावही रुबी होते.
इकडे पत्नी गेल्याने नीरजही एकटा पडला होता. चारपैकी तीन मुले पत्नीसोबत गेली होती. दुसरीकडे मुकेशची पत्नीही आणि मुलेही एकटी पडली होती.
याचदरम्यान मुकेश आणि रुबीला शोधण्याच्या प्रयत्नात नीरजचे मुकेशच्या पत्नीसोबत बोलणे झाले. हळूहळू दोघांतील संवाद वाढत गेला.
दोघांनाही आपल्या नात्यात धोका मिळाला होता. त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येत गेले आणि त्यांनी आता लग्नही केले.
लग्न करून मुलांना स्वीकारले, कुणीही तक्रार केली नाही
मुकेश आणि नीरज एकमेकांच्या पत्नीशी विवाह करून खूप आनंदी आहेत. रुबीलाही दुसऱ्या रुबीबद्दल कसलिही तक्रार नाही. दोघीही एकमेकींच्या पतीसोबत आनंदी आहेत आणि यालाच आपले कुटुंब मानत आहेत. नीरज आणि मुकेशनेही एकमेकांच्या मुलांचा स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे पळून गेल्यानंतर दोघेही मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांत आपली नवी पत्नी आणि मुलांसह राहत आहेत.
आफ्रिकन जमातीत दुसऱ्याच्या पत्नीला पळवून दुसरे लग्न करू शकता
एकमेकांच्या पत्नीसोबत लग्न करण्याच्या घटनेने तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. मात्र असे अजब-गजब नियम-कायदे जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आहेत.
आफ्रिकेत बोदाबे नावाची एक जमात आहे. या जमातीत नियम आहे की पहिले लग्न जमात आणि कुटुंबाच्या इच्छेने केले जाईल. दुसऱ्या लग्नासाठी प्रत्येक जण स्वतंत्र आहे. मात्र अट ही आहे की दुसरे लग्न कुमारिकेशी होणार नाही.
जर एखाद्याला दुसरे लग्न करायचे असेल तर त्याने कुणाच्या तरी पत्नीला लग्नासाठी राजी करायला हवे. या जमातीत एनेकदा एकमेकांच्या दुसऱ्या पत्नीसोबत विवाह करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.