आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामाच्या दरम्यान होणारी सामुदायिक चर्चा रचनात्मक, उत्पादक असेल तर ती चांगली समजली जाते. एका समूहात जर भिन्न विचारप्रणाली असतील तर ते सर्वार्थाने फायदेशीर असते, असे संशोधनांतून समोर आले आहे. खासकरून हे तेव्हा फायदेशीर असते जेव्हा सर्वजण आपले विचार आणि विशेष बाबींची देवाणघेवाण करण्यासाठी तयार असतात. लक्षात ठेवा, प्रभावी चर्चेसाठी चांगल्या सवयी असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी चार उपाय केले जाऊ शकतात...
1) तुम्ही एका टीमचे सदस्य आहात, हे विसरू नका
कोणत्याही चर्चेची सुरुवात एक ठराविक उद्दिष्ट आणि पूर्ण उत्सुकतेने करायला हवी. त्यासाठी सुरुवातीला, हे स्पष्ट करा की उद्दिष्टानुसारच आपले विचार मांडायला हवेत. हेही सांगा की उद्दिष्टाला धरूनच सर्वांच्या समोर मांडल्या जाणाऱ्या विचारांचेच स्वागत केले जाईल. या चर्चेत सर्वजणांंचा सहभाग बरोबरीचा असेल. सर्वजण टीमचे सदस्य आहेत, हे विसरू नका.
2) आपल्या उद्दिष्टावरून लक्ष विचलित होऊ नये
योग्य दिशेने चर्चा पुढे गेली पाहिजे, हे उत्पादकतेसाठी अत्यंत आवश्यक असते. कोण अधिक जोरात बोलतो, कोण अधित चिंतन करतो किंवा कोण योग्य आहे, कोण चूक आहे, चर्चा एवढ्यापुरती मर्यादित राहू नये. तथ्य आणि व्याख्या यातील फरक समजून घ्यायला हवा. तुम्हाला जर असे वाटले की चर्चा एका अनावश्यक दुसऱ्या विषयावर पोहोचली आहे, तर अशा वेळी चर्चा थांबवून ती पुन्हा सुरू करायला हवी.
3) वैयक्तिक शेरेबाजी टाळणे गरजेचे आहे
आपले विचार आणि व्यक्तिमत्त्वावर थेट आक्रमण होत आहे, असे लोकांना वाटायला लागले की कोणतीही चर्चा मोडित निघते. अंदाज बांधणाऱ्यांपासून आणि नकारात्मक प्रश्न उपस्थित करणाऱ्यांपासून दूर राहा किंवा त्यांना विचारा की ‘तुम्हाला असे का वाटले?’ किंवा ‘कोणता विचार करून आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहात?’ सर्वांची नियत चांगली आहे, असे समजून वाटचाल करा. समूहाला पुढे नेण्यासाठी लोकांचे कौतुकही करा.
4) कौतुक करा, बौद्धिक विनम्रता अंगीकारा
चर्चेला रचनात्मक आणि उत्पादक करण्यासाठी सहभागींना बौद्धिक रूपाने विनम्र होणे अत्यंत गरजेचे आहे. याचा अर्थ असा की कोणाच्याही बोलण्याला वैयक्तिकपणे घेऊ नये. तुम्ही जर एखाद्याशी असहमत असाल तरी त्यांचे म्हणणे ऐकूण घेऊन त्याचा सन्मान करायला हवा. तुम्हाला एखाद्यावेळी वाटले की तुम्ही चूक आहात तर त्याचा स्वीकार करायला हवा. चांगल्या विचारांचे आनंदाने कौतुकही करायला हवे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.