आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • You Can Follow This Scientific Method To Learn New Things And Remember Them For A Long Time

सक्सेस मंत्र:नवे शिकून घेणे आणि ते दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी या वैज्ञानिक पद्धती अवलंबू शकता

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती रतन टाटा यांनी गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर पियानो वाजवतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यांनी लिहिले की लहानपणी त्यांना पियानो वाजवणे थोडेसे माहीत होते. आता निवृत्तीनंतर ते शिकण्यासाठी पुन्हा धडे घेत आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग दरवर्षी काही तरी नवीन शिकण्यासाठी नवीन संकल्प करतात. यामध्ये मंदारिन भाषा शिकण्यापासून ते दररोज नवीन लोकांना भेटण्यापर्यंत (जे व्यावसायिक जीवनापेक्षा वेगळे आहेत), दर दोन आठवड्यांनी नवीन पुस्तक वाचणे आदींचा समावेश आहे. मार्कच्या मते, असे केल्याने त्याच्या दृष्टिकोन विस्तार करण्याची संधी मिळते. जगभरातील यशस्वी लोक मानतात की नव्या गोष्टी शिकणे आणि पटकन शिकणे ही त्यांच्या वाढीची गुरुकिल्ली आहे. नवा व्यवसाय सुरू करणे, स्थापित व्हेंचर वाढवणे किंवा नोकरीची कामे पूर्ण करणे असो, नवीन शिकण्याबरोबर गती वाढवणे महत्त्वाचे आहे. चांगली गोष्ट अशी आहे की योग्य रणनीतीमुळे तुम्ही नवीन गोष्टी सहज शिकू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादे कौशल्य शिकायचे असेल, तर त्यासाठी छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा आणि त्या भागात प्रवीण होण्याचे तंत्र शिका. तुम्हाला गिटार वाजवायला शिकायचे असेल तर लगेच ट्यून वाजवण्याचा प्रयत्न करू नका. प्रथम आपल्या बोटांनी असे दाबायचे ते शिका. जेव्हा सोयीस्कर असेल, तेव्हा ट्यून वाजवण्यासाठी पुढे जा. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची शिकण्याची प्रक्रिया सुधारू शकता.

छोट्या तुकड्यात वाटून पूर्ण करा गोल, संदर्भासह लक्षात ठेवा वस्तुस्थिती तुम्हाला काही महत्त्वाचे सादरीकरण द्यायचे असल्यास एकदा ड्राफ्ट करा आणि पूर्ण वाचा. मग त्यात सुधारणा करा. यानंतर काही तास किंवा एक दिवसाचा अवधी घ्या. मग ते सादर करण्यासाठी तालीम करा. तुकड्यांमध्ये काम करण्याची ही प्रथा आहे. स्टडी फेज रिट्रीव्हल थिअरीनुसार, जेव्हा तुम्ही ध्येय अशा तुकड्यांमध्ये पूर्ण करता, तेव्हा ते तुमच्या स्मरणशक्तीमध्ये पुन्हा पुन्हा जाते आणि मेंदू ते अधिक लक्षात ठेवण्यास सक्षम होतो. याशिवाय संदर्भासह गोष्टी लक्षात ठेवल्या तरी त्या दीर्घकाळ लक्षात राहतात. उदाहरणार्थ, एखादा जुना चित्रपट पाहताना, तो चित्रपट आपण प्रथमच कुठे पाहिला हे आठवते. संदर्भ आपल्याला यासारख्या गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करतात.

स्व-चाचणी आणि नोट्स घेणे ठरेल फायदेशीर ब्रिटिश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन स्वतःच्या नोट्स ठेवतात. संशोधनातून असे समोर आले आहे की हाताने लिहिलेल्या नोट्स दीर्घकाळापर्यंत गोष्टी लक्षात ठेवण्यास मदतनीस ठरतात. जर्नल ऑफ सायकोलॉजिकल सायन्स इन पब्लिक इंटरेस्टच्या मते, स्व-चाचणीमुळे शिकण्याचा वेगही वाढतो. कार्य शिकण्याच्या प्रक्रियेत स्व-चाचणी घ्या. जर तुम्ही प्रश्नांची उत्तरे चुकीची देत असाल तर तुम्हाला त्यांची योग्य उत्तरे मिळाल्यावर ते दीर्घकाळ लक्षात राहतील.

बातम्या आणखी आहेत...