आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Travel
  • India। Foreign Travellers Coming To India Will Not Have To Be Quarantined From Today But These Conditions Will Have To Be Followed

भारतात विदेशी पर्यटकांना प्रवासाची मंजूरी:आजपासून भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांना मिळणार क्वारंटाईनपासून मुभा, मात्र शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे करावे लागणार पाळण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांवर असलेली क्वारंटाईनची बंदी अखेर आज हटवण्यात आली. मात्र पर्यटकांना शासनाने दिलेल्या काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांसाठी एक गाईडलाईऩ्स देखील मागच्या आठवण्यात जारी केली होती.

त्यात विदेशी पर्यटकांना भारतात प्रवेश करतांना कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखाद्या पर्यटकाने जर कोरोना लसीचे दोन्ही डोस किंवा एकही डोस घेतला नसेल तर, संबंधित विमानतळावर त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना सात दिवस भारतात होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

त्यानंतर पुन्हा सात दिवसानंतर कोरोना चाचणी करूनच त्यांना पर्यटनाची परवानगी दिली जाईल. WHO ने ज्या कोरोना लसीला आपातकालीन वापराला परवानगी दिली आहे. अशाच लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र गृहीत धरले जाणार असून, कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र देखील विमानतळावर जमा करावे लागणार आहे. यासंबंधी गाईडलाईऩ्स केंद्र सरकारने 20 ऑक्टोंबरला जारी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...