आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासाठी जाणून घेणे गरजेचे:ड्रिंक अँड ड्राइव्हवर दंड, जेल किंवा दोन्हीही शक्य; वाहन कोर्टातून सुटेल

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रिंक अँड ड्राइव्हवर काय होईल?
वाहन अधिनियम २०१९ च्या कलम १८५ नुसार, भारतात मद्य पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. एखादी बाइक किंवा वाहन चालवताना चालकाच्या रक्तात ३० मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहल मिळाल्यास ते ड्रिंक ड्राइव्हच्या श्रेणीत येईल. अल्कोहलची मात्रा निश्चिती घटनास्थळी ब्रीथ अॅनालायजर टेस्टने होऊ शकते.

ड्रिंक अँड ड्राइव्हवर किती दंड किंवा शिक्षा असेल?
ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात कुणी पकडला गेल्यास प्रथम १०,००० रु. दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. किंवा शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकते. हा गुन्हा दुसऱ्यांदा झाल्यास १५,००० रु. दंड किंवा २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचा वाहन परवानाही रद्द होऊ शकतो.

गुन्हा घडला तेव्हा आरोपीसोबत असलेल्या वाहनाचे काय होते?
पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना हा अधिकार नाही की त्यांनी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या आरोपीचे चालान कापावे. अशा पद्धतीच्या आरोपीस वाहतूक पोलिस प्रथम वर्ग न्यायाधीशासमोर हजर करतात. वाहनही कोर्टातून सोडवले जाऊ शकते.

एखादा निर्दोष दबावात गुन्हा कबूल करत असेल तर?
निर्दोष व्यक्तीही गुन्हा कबूल करून दंड भरतात,असे दिसून आले आहे. अशा निर्दोषांनी सुनावणीची मागणी करावी.

साक्षीदारांना कोर्टात बोलावले जावे.
मद्यपान करून किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्यानंतर कार किंवा बाइक चालवणे कायद्याने गुन्हा आहे. पोलिस यासाठी जनजागृतीही करतात. मात्र, अशी प्रकरणे घटत नाहीत. अॅड. डॉ. आशिष श्रीवास्तव यांनी या संदर्भात माहिती दिली.