आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन चार महिने होत असले तरी कारखाना क्षेत्रातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यात एकूण १ कोटी ५९ लाख ४७ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले. त्यापैकी एकट्या अहमदनगर जिल्ह्यात १ कोटी ४६ लाख ८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले.
नगर विभागात नाशिकमध्ये ४, तर नगर जिल्ह्यात २३ कारखाने चालू स्थितीत आहेत. गाळप हंगामाला नोव्हेंबर २०२१ पासून सुरुवात झाली, असली तरी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ६४ हजार हेक्टर आहे. ऊस शिल्लक राहण्याच्या धास्तीने शेतकरी अस्वस्थ आहेत. तथापि, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाही, असे स्पष्ट करून यासाठी सोमवारी (४ एप्रिल) रोजी आढावा बैठक घेणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ४७ लाख २५ हजार ३३३ टन उसाचे गाळप झाले असून १ कोटी ४६ लाख ८ हजार ५८५ क्विंटल साखर उत्पादन केले. जिल्ह्यात सद्यस्थितीत साखर उतारा ९.९२ एवढा मिळाला. ३० एप्रिल २०२२ अखेर सर्वाधिक १२ लाख ४८ हजार ६५० टन गाळप भेंडे येथील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याने केले. या कारखान्यात तब्बल १२ लाख ४५ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. खासगी कारखान्यात सर्वाधिक गाळप कर्जत तालुक्यातील अंबिका शुगर्सने १६ लाख ६३ हजार ३३० टन गाळप करून १७ लाख ६२ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन केले.
नाशिक जिल्ह्यातील तीन सहकारी व एका खासगी कारखान्याने १३ लाख ६ हजार ८७१ टन गाळप करून १३ लाख ३८ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
संगमनेरच्या थोरात कारखान्याने ११ लाख ६९ हजार २३० टन गाळप करून १२ लाख १५ हजार २३० क्विंटल साखर उत्पादन केले. कोपरगावच्या शंकरराव कोल्हे कारखान्याने ७ लाख ४ हजार ५२० टन गाळप करून ६ लाख २६ हजार ९७५ क्विंटल साखर उत्पादन केले. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने ६ लाख ११ हजार ३१५ टन गाळप करून ६ लाख ४८ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले. गणेश कारखान्याने ३ लाख १२ हजार १०० टन गाळप करून २ लाख ३९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादन केले. श्रीरामपूरच्या ‘अशोक’ने ६ लाख ९ हजार ४६० टन गाळप करून ६ लाख ७७ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे कारखान्याने ७ लाख ८४ हजार ४५० टन गाळप करून ६ लाख १४ हजार २२५ क्विंटल साखर उत्पादन केले. राहुरी येथील तनपुरे कारखान्याने ४ लाख २७ हजार ५७० टन गळाप करून ४ लाख ८३ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. श्रीगोंदे कारखान्याने ७ लाख ९९ हजार ३४० टन गाळप करून ८ लाख ४८ हजार ६७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. पाथर्डीच्या वृद्धेश्वरने ४ लाख २५ हजार ९१० टन गाळप करून ४ लाख ५२ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केले. नेवाशाच्या मुळा कारखान्याने ११ लाख ४७ हजार ७९० टन गळाप करून ९ लाख ९३ हजार क्विंटल साखर पोते उत्पादन केले. शेवगावच्या ‘केदारेश्वर’ने ४ लाख २३ हजार ८४० टन गाळप करून ४ लाख ६ हजार ५९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कुकडी कारखान्याने ७ लाख २० हजार ४०० टन गाळप करून ७ लाख २५ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले, अशी माहिती कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी दिली.
दररोज ९४ हजार टन होतेय गाळप, सर्व ऊस गाळप झाल्यानंतरच पडणार पट्टा
‘सहकारी’चे ९८ लाख टन गाळप
नगर जिल्ह्यातील १४ सहकारी साखर कारखान्याने ९८ लाख ७५ हजार ९६० टन उसाचे गाळप करून ९७ लाख २९ हजार ६७० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले. नगर जिल्ह्यातील ९ खासगी कारखान्यांनी ४८ लाख ५० हजार १२५ टन गाळप करून ४८ लाख ७८ हजार ९१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सहकारीत सर्वाधिक गाळप ज्ञानेश्वर कारखान्याने केले.
साखर उतारा म्हणजे काय
एक टन उसापासून १०० किलो साखर उत्पादन झाले, तर त्याला उतारा १० येतो. जिल्ह्यात सर्वाधिक उतारा अकोले येथील ‘अगस्ति’चा ११.२५ आला. म्हणजे एका टनापासून ११५ किलो साखर उत्पादन झाले. ‘अगस्ति’ने ४.९० लाख ६०० टन गाळप करून ५ लाख ५२ हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सर्वात कमी उतारा ‘गणेश’चा ७.६९ एवढा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.